शासन, प्रशासन दिव्यांग कायदा २०१६ कलम ९२ ची अंमलबजावणीसाठी दिव्यांग आयूक्त पुणे येथे दि.८ फ्रेबू २०२३ बोंबाबोब आंदोलनात संघटितपणे सहभागी व्हा – चंपतराव डाक़ोरे पाटिल
शासन, प्रशासन दिव्यांग कायदा २०१६ कलम ९२ ची अंमलबजावणीसाठी दिव्यांग आयूक्त पुणे येथे दि.८ फ्रेबू २०२३ बोंबाबोब आंदोलनात संघटितपणे सहभागी व्हा – चंपतराव डाक़ोरे पाटिल
दिव्यांगाना शासन प्रशासन यांच्याकडुन दिव्यांग कायदा २०१६ कलम ९२ ची अंमल बजावणी होत नसल्यामुळे दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेत्रत्वाखली दिव्यांग आयूक्त पुणे येथे दि.८ फ्रेबू.२०२३ येथे दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासाठी बोंबा बोब धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
ज्या दिव्यांगाना चालता येत नाहि, बोलता येत नाहि, ऐकु येत नाहि, दिसत नाहि अशा विविध प्रकारच्या दिव्यांगाना न्याय हक्क मिळावा म्हणुन भारत स्वंतत्र झाल्यापासुन अनेक दिव्यांग कायदे करण्यात आले. पण देश स्वतंत्र होऊन पंच्याहात्तर वर्षात आजहि दिव्यांगाना न्याय हक्क मिळत नसल्यामुळे मा.पंतप्रधान यांनी दिव्यांग कायदा 2016 ची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणुन दिव्यांग बांधवाना अंपग शब्दऐवजी दिव्यांग शब्द वापरून त्यांना मानसन्मान दिला.
जर कोण पांगळे, लंगडे, अंधळे म्हणुन हिन वागणुक दिल्यास त्यांना हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या, शासन दप्तर दिरंगाई , दिव्यांग कायदा २०१६ प्रमाणे कलम ९२ प्रमाणे गुन्हा नोंदऊन कडक क्षिक्षेची तरतुद करण्याचा शासन निर्णय असुन त्याची अंमल बाजावणी महाराष्ट्रात होत नसल्यामुळे दिव्यांग बांधवाना शासन दरबारी न्याय मिळावा म्हणुन नाईलाजाने जन आंदोलन करून न्याय तर मिळत नाहि. साधे ऊत्तर मिळत नसल्यामुळे ऊपोषण, मोर्चे, धरने, आंदोलन करावे लागतात. त्यात सोलापुर जिल्हयात ऊपोषणात एका दिव्यांगाना जिव गमावला लागला तर दिव्यांग वस्तीगृहात मंतीमंद दिव्यांगाना चटके देण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातील कुंचेली येथे चंपतराव डाकोरे दिव्यांगाच्या जमीनीवर गैर अर्जदार यांच्याकडे कोणताही पुरावा नसताना अतिक्रमण करण्यात आले. त्या दिव्यांगाने जुन २०२२ पासुन प्रशासन, लोकशाही दिनी अकरा महिन्यापासुन व वारंवार चकरा मारुन न्याय मिळाला नाही.
तसेच कंधार तालुक्यातील दहिकळंबा येथील दुधकवडे तुळशिराम दिव्यांगाच्या घराच्या जागेवर अतिक्रमण केले ते सुध्दा लोकशाहि जनता दिनी व संबधितास न्याय मिळाला नाहि.
मुखेड तालुक्यातील मांजरी येथील दोन्हि डोळ्याने अंध असणारे दिव्यांग गुरूबस रेवन अप्पा, वैजनाथ आळे व गावातील मजुर, शेतकऱ्याना गावातील माजी पोलिस पाटिल यांनी नकाशात असलेला रस्ता बंद करून दिव्यांगाना मारहान करून सुध्दा दिव्यांग कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद केला नाहि व न्याय मिळत नसेल तर दिव्मांग कायदा कशासाठि ? अशा अतिक्रमण करणाऱ्या आरोपिला दिव्यांग कलम प्रमाणे गून्हा नोंद करुन क दिव्यांग कायद्याची कटोर अंणलबजावणी करावी.
२) दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने शिबीर.
नांदेड जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य मोजमाप शिबीराचे आयोजन करून लाखो रुपये खर्च करण्यात येऊन अनेक दिव्यांगाना साहित्य आजहि पंचायत समितीने पुर्णपणे वाटप केले नसल्यामुळे शाळेच्या पटागणात गंजुन गेले आहे ते जर वेळेवर वाटप व्हावे म्हणुन अनेक वेळा निवेदन दि २९,मार्च 2022ला जिल्हा अधिकारी कार्यालयसमोर दोन दिवस धरने, आंदोलन मोर्चा करूनहि दखल घेतली नाहि.
वाटप व्हावे म्हणुन दहा महिने पाठपुरावा करुन लाखो रूपयाचे साहित्य त्या दोषि अधिकाऱ्या कडुन वसुल करून दिव्यांगाना तात्काळ साहित्य द्यावे दोषि अधिकारी यांच्यावर कार्यवाहि करावी अशा घटना भविष्यात होऊ नये म्हणुन दिव्यांग कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी न करणाऱ्यावर अधिकाऱ्यावर कडक कार्यवाहि करावी म्हणुन आपल्या हक्कासाठी पंधरा प्रश्नासाठी जास्तीत जास्त दिव्यांगानी संघटिपणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
दिव्यांग वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल महाराष्टृ सचिव मनोज कोटकर, जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, नागोराव बंडे, राजुभाऊ शेरकूरवार, अनिल रामदिनवार, दादाराव कांबळे, ऊमेश भगत, आधवराव पाटिल बालाजी व्होनपारखे, रंजीत पाटिल, ए दतात्रय सोनकांबळे, चव्हाण, मानसिंग वडजे, विठ्ठल बेलकर, ईत्यादी कार्यकर्त नी निवेदनद्वारे केली.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy