आज होणाऱ्या आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील व्हावे – सकल हिंदू समाज

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड शहरात आज सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, स्वप्नील नागेश्वर , श्रद्धा वालकर व निधी गुप्ता यांची धर्मांधांनी निर्मम हत्या केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा असल्याचे समितीने स्पष्ट केले.
देशभरात ३ निर्घृण हत्या या काही दिवसात झाल्या, संपूर्ण देश या घटनांनी हादरले असून स्वप्नील नागेश्वर , श्रद्धा वालकर व निधी गुप्ता यांची काही धर्मांधांनी जिहादी मानसिकतेतून हत्या केली , यावेळी संपूर्ण देशातून रोष निर्माण होत असून ठिकठिकाणी या विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन केले जात आहे.
नांदेड शहरात सुद्धा ता. २९ मंगळवार रोजी भव्य निषेध मोर्चाचे आयोजन सराफा बाजार, भोजालाल गवळी चौक येथून ठीक दुपारी १२ वाजता निघणार असून नांदेड जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधव भगिनी यात सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाज तर्फे करण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या