जनसामान्यांना न्याय मिळवून देणारा निर्भीड पत्रकार बाळासाहेब बुद्धे – शिवराज पवार

लोहा तालुक्यातील मौजे बेरळी (खु.) येथे बाळासाहेब बुद्धे यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1988 रोजी सामान्य कुटुंबात बेरळी येथे झाला.

शिक्षण पदवी पर्यंत झाले.लहानपणापासूनच त्यांना वाचनाचा छंद होता.त्यातूनच त्यांनी काही कालावधीनंतर पत्रकारितेशी नाळ जुळली. वरचेवर प्रगतीचे पाऊल पुढे टाकत त्यांनी आजतागायत जवळपास दै.रिपब्लिकन गार्ड,दै.समता दर्पण, दै.महासागर,दै.प्रतिवीर,दै.शब्दराज अशा विविध वर्तमानपत्रातून आपल्या लेखणीतून वेगळी ओळख निर्माण केली.

आज घडीला ते माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलीस मित्र फाऊंडेशन लोहा तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.लोह्यासारख्या ग्रामीण भागात काम करत असताना तळागाळातील, शेवटच्या माणसा पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना न्याय मिळून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.प्रसंगी त्यांना अनेक अवहेलना अनेक दुःख वाट्याला आले तरीही ते डगमगले नाहीत.

आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी भल्याभल्यांना घाम फोडला. हे केवळ ते आपल्या बुद्धीच्या जोरावर निर्भिडतेवर एक एक पाऊल पुढे टाकत आपला प्रवास सुरूच आहे. ते आणखी जमिनीवरच आहेत. अगदी तन-मन प्रसंगी धनानी ही प्रामाणिकपणाने आपलं कार्य पार पाडत असतात.

निर्भिड, व्यासंगी,शांत,संयमी प्रसंगी परखड वाणी असणार्‍या पत्रकार बाळासाहेब बुध्दे यांची एक दर्जेदार व अग्रगण्य आपल्या वाणीने नावलौकिक असणार्‍या बहुआयामी आणि निर्भीड पणे लेखन करून लोहा तालुक्यातील अनेक ज्वलंत प्रश्न ऐरणीवर आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

समाजातील सर्वसामान्य, गोरगरीब, युवकांचा आदर्श म्हणून त्यांच्या कार्याची वेगळीच ओळख आहे. याचीच दखल घेऊन त्यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलीस मित्र फाऊंडेशन लोहा तालुकाध्यक्ष पदी एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सामाजिक लढ्यात अग्रणी राहून भारतीय संविधान मूल्यांची अस्मितेची अभिमान, शिवछत्रपती,म.फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,महाराजा यशवंतराव होळकर आणि तमाम महामानवांचे विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी धडपडणारे एक तरूण, तडफदार, अभ्यासू आणि यशस्वी वाटचाल अखंडपणे चालविणारे सारखीच एक तळमळ नेहमीच असते की वर्षानुवर्षे प्रवाहापासून दुरावलेल्या सामान्य माणसाला प्रवाहात आणायचे, त्यांना प्रवाहात आणण्यासाठीची त्यांची धडपड, जातीपातीच्या पलीकडे जाऊन उभं केलेलं संपुर्ण त्यांच काम उल्लेखनीय आहे.

बाळासाहेब बुध्दे यांनी आपल्या लेखनातून ह्या सामाजिक कार्याचा आलेख असाच वाढत जावो.आणि जनकल्याणासाठीचा आणि पीडित शोषित वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठीचा आपला लढा असाच चालू राहो. उर्वरित आयुष्यासाठी व भविष्यासाठी आपणास जन्मदिनानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा …!

– शिवराज पाटील पवार
(प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ)
        लोहा तालुकाध्यक्ष
         मो.9763296791

ताज्या बातम्या