बिलोली येथे दर्पण दिना निमित्ताने पोलिस ठाणे, राजकीय पदाधिकाऱ्यांकडून पञकारांचा सत्कार !

 ● पञकारांसाठी राजेंद्र कांबळे यांचे गायन.

(बिलोली ता.प्र – सुनिल जेठे)
बिलोली येथे दि.६ जानेवारी रोजी  दुपारी १;०० वाजता  तालुका व शहरातील  सर्व पञकारांच्या उपस्थिती मध्ये मराठी पञकारितेचे दर्पणकार आचार्य  बाळशाञी जांभेकर यांच्या  जयंती निमित्त विविध ठिकाणी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करुन पञकार दिन साजरा करण्यात आला.

बिलोली शहरात सर्व प्रथम  शासकीय विश्राम गृहात अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने दर्पन दिनाचे औचित्य साधून अ.भा.भ.नि.समतीचे प्रदेश सरचिटनीस राजु पाटील शिंपाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या दर्पन दिनाच्या कार्यक्रमाची सुरूवात दर्पनकार बाळ शास्ञी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून बिलोली शहरासह तालुक्यातील पञकारांचा सत्कार करुन लेखणी भेट देऊन सन्मान केला.

यावेळी पञकार ए.जी कुरेशी, अशोक दगडे, रत्नाकर जाधव, मोहसीन खान, गंगाधर कुडके, गौतम लंके, बसवंत मुंडकर, शेख फारूख, शेख युनुस, संदिप गायकवाड, सतिष बळवंतकर, मार्तंड जेठे, सुनिल जेठे, साईनाथ शिरोळे, कमलाकर जमदाडे, गणेश गिरगावकर, संजय जाधव, धम्मपाल जाधव, मुकींदर कुडके, सुनिल कदम, साहेबराव दावलेकर, संजय पोवाडे, प्रल्हाद पाटील, गजानन कोपरे, भास्कर कुडके, संदिप कठारे, आत्माराम पाटील, शिवमणी नागुलवार, प्रकाश फुगारे यांच्यासह अनेक पञकार बांधव उपस्थित होते.

 

तद्नंतर बिलोली पोलीस ठाण्याच्या वतीने पो.नि.मा.अनंत नरुटे यांनी दर्पणकार दिन बाळशाञी जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन केले. पो.नि.अनंत निरुटे यांनी ठाणेच्या वतिने पञकार बाधवांना पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या दर्पण दिना च्या कार्यक्रमात मोठ्या संखेने पञकार उपस्थित झाले होते.

यानंतर एम आय एम आय (MIMI) पार्टीचे युवा नेता तालुका अध्यक्ष मा. सय्यद फिरदोस यांनी बाजार गल्ली येथे आपल्या कार्यालयात पञकार दिनांचे औतित्य साधुन दर्पणकार दिन बाळशाञी जांभेकर यांच्या प्रतिमेला सय्यद फिरदोस याांनी पुष्पहार टाकून उपस्थित पञकार बांधवांना पेन, पॕड, देऊन पुष्पहाराने सन्मान व सत्कार केला.

तर विजय कुंचनवार यांच्या मंगलकार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजय कुंचनवार यांनी सर्व पञकार सन्मान सोहळा आयोजित करुन पञकारितेचे दर्पणकार आचार्य  बाळशाञी जांभेकर यांच्या प्रतिमेला कुंचनवार, यशवंत गादगे, विठ्ठल चंदनकर, राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले.

सदरिल कार्यक्रमात उपस्थित पञकार व मान्यवर मनोगत व्यक्त करताना पञकार कसा असाव, त्यांचे कार्य काय असते, त्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. यशवंत गादगे यांनी पञकार कै.एकनाथ शेरे यांनी पञकार म्हणून कार्य कसे केले त्याच्या लेखनीने अधिकारी व राजकीय नेत्यांवर प्रभाव पडून सन्मान मिळवणारी पञकारता होती. आज असलेल्या पञकारात ती पञकारीता दिसुन येत नाही, तर पञकारांनी पञकारीता कुणाच्या सांगण्यावरुन न करता सत्यता जानून घेऊन निर्भिडतेने लिहिल पाहिजे असे यशवंत गादगे म्हणाले.
 राजेंद्र कांबळे यांनी गीत गायनातुन पञकार बांधवांना संदेश दिला. यावेळी सर्व पञकार व भाजपा कार्यकर्ते इंद्रजित तुडमे, यशवंत गादगे, सय्यद रियाज, राजु गादगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सदरिल कार्यक्रमात सुञसंचलन मुकींदर कुडके तर आभार विजयकूमार कुंचनवार यांनी मानले.
व्यापार आडत संघटनेचे अनुदत्त रायकंठवार यांनी आपल्या किराणा स्टोर येथे पञकारांना निमंञीत करुन पञकारांन पेन, संस्कृत भाषेचे ग्रंथ, पुष्प देऊन सन्मान व सत्कार केला.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या