पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा सहसचिव पदी आनंदा सूर्यवंशी !

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
बिलोली तालुक्यातील कोळगाव येथील तथा कारेगाव फाटा लोकमत प्रतिनिधी आनंदा नारायण सूर्यवंशी यांची नुकतीच पत्रकार संरक्षण समितीच्या नांदेड जिल्हा सहसचिव पदी निवड करण्यात आली.

मागील अनेक वर्षापासून पत्रकारितेतील त्यांचे योगदान व सामाजिक कार्याची आवड पाहता महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समितीने त्यांची नांदेड जिल्हा सहसचिव पदी निवड करून तशा नियुक्तीचे पत्र जिल्हा सचिव शशिकांत गाढे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले.

प्रेरणा पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मण पाटील, मुख्याध्यापक मारोती मोरे, पर्यवेक्षक शिवानंद लाठकर, प्रा. मारोती खनपट्टे, सहशिक्षक बाबुराव रुद्रावाड, अरविंद इंगळे, अशोक बोगरे, शिवाजी नरवाडे आदींसह अनेकांनी या निवडीचे स्वागत केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या