शिक्षकांच्या मारहाणीत तिसरीत शिकणा-या इंद्रकुमारचा मृत्यू, धर्माबाद मध्ये निषेध ; शिक्षकास शिक्षेची मागणी.

( मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क  )
राजस्थान राज्यातील शिक्षकाच्या मारहाणीत तिसरीत शिकणारा इंद्रकुमार या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यामुळे धर्माबाद येथे या घटनेचा निषेध करून शिक्षकास शिक्षेची मागणी करण्यात आली आहे.
 जालोर जिल्ह्यातील एका खासगी शाळेच्या शिक्षकाने केलेल्या मारहाणीत ९ वर्षाच्या पिडित इंद्रकुमार मेघवाल या दलित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
तो संबधित खासगी शाळेत इयत्ता ३ री मध्ये शिकत होता. शिक्षकांसाठी ठेवण्यात आलेल्या माठातून विद्यार्थ्याने पाणी पिल्याने त्याला जातीयवादी शिक्षकाकडून मारहाण करण्यात आली. यात इंद्रकुमार या मुलांचा मृत्यू झाला.
अशा जातियवादी शिक्षकाला निलंबित करुन कठोरात कठोर शिक्षेच्या मागणीचे निवेदनादन धर्माबाद पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी यांना देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी महासचिव गौत्तम देवके, पत्रकार चंद्रभीम हौजेकर, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सदानंद देवके, सचिव तथा पत्रकार धडेकर गंगाधर, शुभम थोरमोठे, उत्तम बनसोडे, माधवराव वाघमारे कांगठीकर, दिलीप झुंजारे, माधव हनुमते, आदर्श सिरसे, नितिन थोरमोठे, किशन जुनीकर, निखिल थोरमोठे, वाघमारे विलास, मारोती वाघमारे, शिरसे आकाश, सिरसे अभिनंदन, धडेकर विजय, शंकर सोनटक्के, किर्तीराज गायकवाड, चांदोबा वाघमारे, शेळके माधव, सुधाकर वाघमारे, सुदर्शन वाघमारे, जुणीकर अरुण यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या