डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाचा सुत्रधार शोधून काढण्यासाठी नायगाव अंनिसचे तहसिलदारांना निवेदन

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा 20 ऑगस्ट, 2013 रोजी निर्घुन खूनाला आज 10 वर्ष पुर्ण झाले असून अद्याप त्यांच्या खूनाचा सुत्रधार पकडण्यासाठी राज्य सरकार चालढकल करून एक प्रकारे मारेकऱ्यांना व सुत्रधारांना अभय देत आहे. म्हणून या बाबीचा निषेध करण्यासाठी नायगाव तालूका अंधश्रदा निर्मुलन समितीच्या वतीने तहसिलदार नायगाव यांना डॉ. दाभोळकर यांच्या खूनामागील सुत्रधारांना अटक करण्यात यावे यासंबंधीचे निवेदन देण्यात आले.

दि.20 ऑगस्ट ,2023 रोजी सकाळी 6:00 वाजता नायगाव ते शेळगाव रोडवरील राजर्षी शाहु नगरापासून साईतीर्थ मंगल कार्यालय नायगाव पयेथपर्यन्त निर्भय मॉर्निग वाक करण्यात आले व यावेळी शासनाच्या बोटचेपे धोरणाचा निषेध करून डॉ. नरेंद्र दाभोळकर अमर रहे, खूनाच्या सुत्रधाराचा शोध घेण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, अंनिस जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
निर्भय मॉर्निंग वाकमध्ये अंनिसचे पदाधिकारी व इतर अनेक व्यक्ती सहभागी झाले होते. या निवेदनावर अंनिस नायगाव तालूका अध्यक्ष ह. स. खंडगावकर, कार्याध्यक्ष प्रा.डॉ. शंकर गड्डमवार, प्रधान सचिव भा. ग. मोरे व सा.रा. जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या