स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त के रामलू शाळेच्या भव्य प्रभात फेरीने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्रांतिवीरांच्या वेशभूषेत के रामूलू शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात कुंडलवाडी नगरातून प्रभात फेरी काढली. यात लेझीम पथक, डंबेल्स पथक, तिरंगा पथक, हिंदू, मुस्लिम, शिख व बौद्ध या सर्व धर्माच्या वेशभूषेतून विद्यार्थ्यांनी भारतीय एकात्मतेचे दर्शन घडविले.

बेटी हिंदुस्तान की या गीतावर लेझीम पथकातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरणातून भारतीय अमृत महोत्सवाची 75 हे अंक काढत लोकांचे लक्ष वेधून घेतले. इयत्ता नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, झाशी की राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या थोर व्यक्तींच्या वेशभूषेत सहभागी होऊन प्रभात फेरीची शोभा वाढवली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे संस्था अध्यक्ष श्री साई रेड्डी ठक्कूरवार , सचिव यशवंत संगमवार,संचालिका सौ रमा ठक्कूरवार, मु.अ. श्री मठवाले पी.एच., श्री. ईश्वर झंपलकर, पर्यवेक्षक श्री. कागळे आर.डी सहशिक्षक श्री कासलोड आर. एस., सौ अर्चना नरोड श्री येमेकर एन.जी, सौ दाक्षायणी नुग्रावार या सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या