के.रामलू शाळेचे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या दोन्ही परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहिर झाला असून या परीक्षेत कोरोना सदृश्य परिस्थिती असताना देखील आपली यशाची परंपरा कायम ठेवत के.रामलू पब्लिक स्कूल कुंडलवाडी या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.
पूर्व माध्यमिक परीक्षेत प्रथमेश रविकिरण इंदुरकर २९८ पैकी २२० गुण व भूमिका संजय माहेवार यांनी १७६ गुण घेतले आहेत. तसेच पूर्व प्राथमिक परीक्षेत कु. तेजोनिधी नित्यानंद माडेवार ३०० पैकी २०४ व श्रीराम राजेश्वर इंदुरकर १८८ गुण घेवून हे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.
तर प्रथमेश रविकिरण इंदुरकर हा विद्यार्थी सर्वसाधारण शहरी भागातून जिल्हा स्तरावर १४ वा क्रमांक घेऊन शिष्यवृत्ती धारक झाला आहे. या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. सायरेडडी ठक्कुरवार संचालिका रमा ठककुरवार, मुख्याध्यापक अभिलाष गोसुला व शाळेतील सर्व शिक्षकवृंदानी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या