श्रीक्षेत्र कहाळा येथे चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 नायगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र कहाळा येथील श्री मल्हारी म्हाळसाकांत महाराज देवस्थानात दिनांक 24 नोव्हेंबर पासून चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आयोजित केलेल्या कार्यक्रमात कीर्तन महोत्सवाला प्रतिसाद मिळत आहे. सर्व धार्मिक कार्यक्रम गुरुवर्य निळकंठ महाराज कहाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. धनंजय महाराज कहाळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चंपाषष्ठी उत्सव सुरू झाला आहे.
दिनांक 25 शुक्रवार ह.भ.प.श्री मधुसूदन महाराज कापसीकर यांचे किर्तन, दिनांक 26 शनिवार ह.भ.प. श्री विक्रम महाराज नांदेडकर, दिनांक 27 रविवार ह.भ.प.श्री भालचंद्र महाराज सरदेशपांडे, दिनांक 28 सोमवार ह.भ.प. श्रीमती मीराताई शेंडगे, दिनांक 29 मंगळवार ह.भ.प.श्रीमती मीराताई शेंडगे यांचे किर्तन होणार आहे.
दिनांक 30 बुधवारी गीतरामायण भावगीतांचा कार्यक्रम जेष्ठ गायक श्री संजय जोशी व सहकारी वर्ग नांदेड यांचा आयोजित करण्यात आला आहे. चंपाषष्ठी उत्सवातील खास आकर्षण म्हणजे तळीचा कार्यक्रम दिनांक 29 रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजता तळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दररोज समाधीस अभिषेक आराधना मंत्र पुष्पांजली आरती महाप्रसाद कार्यक्रम होत आहेत. या सर्व धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री मल्हारी माळसाकांत महाराज देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या