अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना सरसगट हेक्टरी 50 हजारांची मदत सरकारने द्यावी – कैलाश देशमुख गोरठेकर

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील उमरी, नायगाव, धर्माबाद तालुकाही त्यास अपवाद राहिलेला नाही, अतिवृष्टीमुळे नदीकाठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमीन वाहून गेल्या असून उभ्या पिकात पुराचे पाणी शिरल्यामुळे कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर व ऊस यासारख्या खरीप हंगामातील पिकांसह फळबागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, यासंदर्भात युवा नेते संचालक कैलास देशमुख गोरठेकर यांनी आज तहसिल कार्यालय उमरी येथे तहसिलदार माधव बोथीकर साहेब, यांची भेट घेऊन निवेदन दिले. व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांला सरसगट हेक्टरी 50 हजारांची मदत सरकारने द्यावी अशी मागणी केली …..
यावेळी सोबत शिवाजी पाटील चिंचाळकर, कैलास पाटील ईज्जतगावकर, ज्ञानेश्वर पाटील शेलगावकर, हानंमत पाटील कुदळेकर, ज्ञानेश्वर पाटील कुदळेकर, अमित पटकुटवार, संकेत मूक्कावार, नारायण पाटील गोळेगावकर, मंगेश डोप्पलवार, मसुद सय्यद, राजु सवई, गजानन लकडेवाड, गगांधर चितांके, रोहित देवकवाड, अमोल पाटील गणीपुरकर, गणेश पाटील कुदळेकर, गंगाधर पाटील कुदळेकर उपस्थित होते ….!!
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या