अंधश्रद्धा निर्मूलनासाठी व्यापक प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे – कमलाकर जमदाडे !

[ धर्माबाद – चंद्रभीम हौजेकर ]
२८ फेब्रुवारी हा जागतिक विज्ञान दिन औपचारिक म्हणून साजरा करू नये. केवळ कर्मकांड न होता खऱ्या अर्थाने कृतीशील उपक्रम विद्यार्थ्यांना देवून विज्ञान दृष्टी निर्माण करणे आज काळाची गरज आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे यांनी केले. जि.प.शाळा येवती ता.धर्माबाद येथे आयोजित केलेल्या विज्ञान अपूर्व मेळाव्यात
अंधश्रद्धेची दुनिया, चमत्कारांची किमया या आगळ्या वेगळ्या सप्रयोग कार्यक्रमात जमदडे बोलत होते. सुमारे 190 विद्यार्थी विद्यार्थिनी कृतिशील सहभाग घेतला. प्रमुख पाहुणे अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे यांच्या हस्ते डॉ.सी.व्ही रामन यांच्या प्रतिमेला कागदाच्या राखे पासून फुल बनवून अनोखे उद्घाटन करण्यात आले. भोंदू मांत्रिक, तांत्रिक, देवी अंगात आणून करत असलेल्या दैवी शक्तीने लंगर सोडवणे, नजरेने नारळ थांबवणे, जिभेतुन त्रिशूळ आरपार करणे, जळता कापूर खाणे
असे विविध बहारदार चमत्कारांची प्रात्याक्षिके विद्यार्थ्यांना सहभागी दाखवण्यात आली. त्यामागील विज्ञान हातचलाखी समजावून देण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी करखेली बीडचे शिवकुमार पाटील, व्यंकटेश बत्तूलवार, गोविंद येळगे, पंडित दगडगावे, सौ.पुष्पलता नोरलेवाड, निरंजन महेशकर, कु.क्षितिजा जमदडे, आदी उपस्थित होते. या नियोजित कार्यक्रमासाठी, शिवकुमार पाटील व सचिन भोसले यांनी अथक असे परिश्रम घेतले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या