कांडाळा येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी बालाजी पाटील कदम यांची निवड !

[ नायगाव ता. प्र. – गजानन चौधरी ]
कांडाळा गावातील युवा नेतृत्व बालाजी एकनाथ पाटील कदम यांचा तंटामुक्ती अध्यक्ष पदी भरघोस मतांनी विजयी झाला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बालाजी कदम यांनी गावातील नागरिकांसाठी केलेल्या समाज हिताचे कार्य लक्षात घेऊन व गेल्या अनेक वर्षापासून बालाजी कदम हे कांडाळा गावातील सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी सदैव प्रयत्न करीत आहेत व सर्वसामान्याचे प्रश्न सोडविण्याचा सदैव प्रयत्न करीत आहे.
गावातील लोकांचे झालेले तंटे गावातच कशी मार्गी लावता येतील असे कसोटीने प्रयत्नरत असल्यामुळे याच कार्याची दखल घेऊन गावातील नागरिकांनी बालाजी कदम यांच्यावर तंटामुक्ती अध्यक्षाची जवाबदारी टाकण्यात आली आहे.
तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवडूनुक यशस्वी करण्यासाठी कांडाळा गावचे ग्रामसेवक पी .जी. वाघमारे साहेब, शिक्षिका देवपुंजे मॅडम, शिक्षक धानोरकर सर यांनी निवडणूक घेऊन निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.
यावेळी कांडाळा गावचे ज्येष्ठ नागरिक मार्केट कमिटीचे माजी संचालक परसराम पा जाधव, सेवा सहकार सोसायटी चेअरमन दिलीप पा जाधव , माजी उपसरपंच विजय पा जाधव, उपसरपंच रमेश पा जाधव, कैलास पा कदम, विलास पा कदम, परसराम येरेवाड संतोष येरेवाड शिवाजी पा जाधव, जयसिंग पा जाधव, गजानन पा कदम, केशव पा जाधव ,परमेश्वर पा जाधव व गावातील सर्व मंडळी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या