कंधार येथील उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी आमदार व विरोधकांत जुंपली !

कंधार येथील उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी कंधार-मुखेड चे आमदार तुषार राठोड व खासदार यांना निमंत्रित केले नाही. 

शासकीय प्रोटोकॉल न पाळल्याने उपविभागीय अधिकारी बोरगांवकर यांना जाब विचारण्यासाठी भाजपा चे कंधार तालुका अध्यक्ष भगवान राठोड व शहर अध्यक्ष गंगाप्रसाद (पिंटू) यन्नावार व कार्यकर्ते गेले असता त्यांच्यात व आमदार शामसुंदर शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.व भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा व आमदार शिंदे यांचा निषेध व्यक्त करत तहसील कार्यालयाच्या समोर घोषणा दिल्या.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या