शास्त्री महाविद्यालयात एनसीसी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया संपन्न ; कारगील विजयी दिनानिमित्त वृक्षारोपण !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात दि.26 जुलै रोजी एन सी सी विभागाच्या वतीने 13 मुली व 10 मुलांना नव्याने निवड प्रक्रियेतुन प्रवेश देण्यात आला तर ही निवड प्रक्रिया प्रमुख उपस्थित मान्यवर म्हणून कर्नल एम.रंगाराव, महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे व उपप्राचार्य डॉ.योगेश जोशी यांच्या उपस्थितीत पार पडली.
         याप्रसंगी 26 जुलै हया कारगिल दिनाचे ओचित्य साधून एनसीसी विभागाच्या वतीने महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे व उपप्राचार्य डॉ.योगेश जोशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी कर्नल एम.रंगाराव एनसीसी विभाग प्रमुख प्रा.ए.ए. माझीद,नायब सुभेदार राकेशकुमार आणि एनसीसीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या