• लाचखोर पोलीस हावलदार तैनात बेग यांना पोलीस कोठडी !
( कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे )
येथील पोलिस ठाण्यातील बीट जमादार तैनात बेग हे दोन हजाराची लाच घेऊन २० सप्टेबंर रोजी सायंकाळी फरार झाले होते.या प्रकरणात कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्या नंतर २२ सप्टेबर रोजी लाच लुचपत विभागा समोर लाचखोर बिट जमादार तैनात बेग हजर झाले. दिनांक २३ स्पेटबर रोजी बिलोली येथील न्यायालया समोर हजर केले असता आरोपी बिट जमादार तैनात बेग यास पोलिस कोठडी मिळाली आहे.त्यातच ठाणे प्रमुख करिमखान पठाण यांची नांदेड येथे २२ सप्टेबर रोजी रात्री तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
पोलिस ठाण्यातील बिट जमादार तैनात बेग हे एका तक्रारदाराकडून १०७ ची कार्यवाही मिटवण्यासाठी २ हजाराची रुपये लाच घेताना २० सप्टेंबर रोजी पिंपळगांव कुं रेाडवरील जिल्हा परिषद शाळेजवळ स्वीकारली याच क्षणी घटनेतील आरोपीस लाच लुचपत विभागाचा सुगावा लागल्याने आरोपी बिट जमादार हे मोटार सायकलवर भरधाव वेगाने फरार झाले होते.त्यानंतर २२ सप्टेंबर रोजी लाच लुचपत विभागा समोर स्वताहून हजर झाले. २३ सप्टेंबर रोजी बिलोली येथील न्यायायलयासमोर तैनात बेग यांना हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.याच प्रकरणावरुण २२ स्पटेबर रोजी मध्यरात्री जिल्हा पोलिस प्रशासनाने सहायक पोलिस निरिक्षक करिमखान पठाण यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली आहे.पठाण यांच्या कार्यकाळात शहरात अवैद्य धंदे व हप्तेखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.असे असले तरी कुंडलवाडी पोलीस ठाणेचा प्रभारी कारभार धर्माबादचे सहायक पोलीस निरीक्षक कथे यांच्याकडे दिला आहे,प्रभारी सहायक पोलीस निरीक्षका समोर शहरातील अवैद्य धंद्याचे मोठे आवाहन आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy