करखेली पं स गणातून निवडणूक लढवणार – अवधूत पाटील  सालेगावकर !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
अवघ्या काही दिवसावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत धर्माबाद तालुक्यातील करखेली सर्कल मधील सामान्य नेतृत्व अवधूत पाटील यांनी चांगलीच पकड निर्माण केली आहे व गोरगरिबांच्या सुखदुःखात धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून अवधूत पाटील यांची ओळख आहे.
यांचा राजकीय उदय युवक काँग्रेस मधून झाला त्यामुळे त्यांना सर्व गोष्टीचा जवळून अनुभव आहे करखेली व परिसरातील सर्व हितचिंतकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय अवधूत पाटील घेतला आहे अवधूत पाटील यांचा तरुण वर्गामध्ये खूप मोठा संपर्क आहे तरुणाचा उत्साह पाहता अवधूत पाटील यांना करखेली पंचायत समिती गटातून काँग्रेस पक्षाने संधी द्यावी व एका सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात सक्रिय करावे ही मागणी अवधूत पाटील यांचे सहकारी करत आहेत.

ताज्या बातम्या