करखेली प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधांचा अभाव !

• गरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळेना – तालुका आरोग्य आधिका-याचे साफ दुर्लक्ष 

[ कारेगाव फाटा:- आनंद सुर्यवंशी ]
करखेली प्राथमिक आरोग्या केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर नऊ पदे रिक्त असण्याने या भागातील गरीब रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसल्याने रुणाचे हाल होताना दिसुन येत आहे.
याकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लालू बोर्डे यांचे साफ दुर्लक्ष होतांना दिसुन येत आहे. करखेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विस ते पंचविस गावाचा सबंध येतो. ग्रामिण भागातील गरीब गरजू रुग्ण या आरोग्य केंद्रात सेवा घेन्यास येतात मात्र येथे वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रात्रीच्या वेळी डिलेडिलेव्हरीसाआलेल्या रूग्णांना नांदेडला जावे लागते. गरीब रुग्णांना ते परवडणारे नाही.
यामुळे गरीब रुग्णाचा जीव धोक्यात जाण्याची शक्यता असते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैधकीय आधिकारी यांच्यासह इतर नऊ पदे रिक्त असुन एक आरोग्य वैद्यकिय आधिकारी व एक परीचर असे दोनच पदे भरलेली आहेत. त्यामुळे करखेली प्राथमिक आरोग्य केंद्र हे ओस पडल्या सारखे दिसत आहे.
आयुष्यामान भारत योजनेत धर्माबाद तालूका जिल्हयात आघाडीवर असल्याचे डॉ. बोर्डे यानी भासवित असले तरी करखेली प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देण्यास असमर्थ ठरल्याचेच दिसुन येते. 
डॉ. बोर्डे हे धर्माबाद‌ ला राहुन तालूक्याचा कारभार पाहताता मात्र आरोग्य केंद्रात एकच नर्स असते. त्यांना ड्युटी संपल्यावर सुटी देण्यासाठी सोडन्यास दुसरी नर्स वेळेवर येत नाही. कोणीही तज्ञ डॉ. अधिकारी येथे नसल्यामुळे रुग्णांना सेवा मिळत नाही.
कारकुन पदावर कार्यरत असलेले सुरकुटवार हे ऑफिसच्या कामा निमिताने जास्त वेळ धर्माबादलाच दिसतात आणि ते अधिकारीच असल्याचे अविर्भावात वागत असल्यामुळे कोणी कर्मचारी त्यांचा समोर बोलण्यास धजावत नसल्याचे बोलल्या जाते. एकंदर सर्व बाबी लक्षात घेतल्यास तालुका आरोग्य आधिकारी डॉ. बोर्डेच जबाबदार असल्याचे जनसामान्यातुन बोलल्या जात आहे.
www.massmaharashtra.com 

 

ताज्या बातम्या