कर्नाटक विधानसभेत काँग्रेस पक्षाच्या विजयाचा नायगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने फटाके वाजून जल्लोष साजरा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
कर्नाटक राज्यातील काँग्रेसच्या विजयाचा नायगाव तालुका काँग्रेसच्या वतीने फटाके वाजून पेढे वाटून जल्लोष कर्नाटक राज्यामध्ये भाजपाच्या साम-दाम-दंड-भेद Ed CBI या नीतीला जनतेने स्पष्ट नाकारले आणि काँग्रेस पक्षाच्या हाती स्पष्ट बहुमताने सत्ता दिली.याचा आनंद आज नायगाव शहरांमध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देश कि आंधी राहुल गांधी, देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो, लोकशाही वाचवायची असेल तर भाजपाचा पराभव झालाच पाहिजे.
कर्नाटक तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी असे विविध नारे देऊन जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सय्यद रहीम शेठ (माजी सभापती पंचायत समिती नायगाव) विराज पाटील चव्हाण,पांडू पाटील चव्हाण (शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी नायगाव) शरद भालेराव (माजी अध्यक्ष न.प नायगाव) संजय पाटील चव्हाण (नगरसेवक प्रतिनिधी) माणिक पाटील चव्हाण (युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नायगाव)हणमंत बोईनवाड (नगरसेवक न.प.) विठ्ठल आप्पा बेळगे (नगरसेवक न.पं.नायगाव) साईनाथ चनावार (ओबीसी सेल शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी नायगाव) फयाद सेठ (सरचिटणीस काँग्रेस) शकील (प्रतिनिधी नगरसेवक),शंकर पाटील चव्हाण, रामेश्वर गायकवाड, बालाजी शिंदे उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या