शेतकरी खातेदारांच्या आशीर्वादाने संस्था मोठी झाली मारोतराव कवळे गुरुजी.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 नायगाव येथील कै. व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या बँकेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्ताने उद्घाटन प्रसंगी संस्थेचे चेअरमन मारोतराव कवळे पाटील यांनी वरील उद्गार काढले.
ते पुढे म्हणाले की,  सिंधी येथे मी शेतकऱ्यांना एकच एकत्र घेऊन केवळ 56 हजार 500 रुपयावर दूध डेरी चालू केली. नंतरच्या काळात व्यवहार मोठा झाल्यामुळे कै व्यंकटराव पाटील कवळे यांच्या नावाने पतसंस्था चालू करून पतसंस्थेच्या जीवावर बँकेच्या दहा शाखा, दूध डेरी ,गुळ प्रक्रिया केंद्र , शुगर फॅक्टरी,आदि उद्योग चालू झाले आहे.

सर्वसामान्यांच्या विश्वास संपादन करून जाती-भेद संस्थेच्या बाहेर ठेवून सर्व समाजाला एकत्र घेऊन सामाजिक उपक्रम राबवत ही संस्था आज नाव रूपाला आलेली आहे.
आज संस्थेची उलाढाल 200 कोटीवर झाली आहे. या दूध डेरी मध्ये या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून सुरेश पा कल्याण, गंगाधर पा कल्याण, बाबुराव मामीडवार गोरठेकर, गजानन चौधरी, ज्ञानेशर शिंदे सर, प्रा रूद्रवाड, संजय सावकार अरगुलवार, गोविंदराव पा बेंद्रीकर, कैलास पा कल्याण, प्रल्हाद पा शिंदे मनुरकर, वडजे पाटील टेंभुर्णीकर, विठ्ठल अण्णा वडपत्रे, कदमसर सुजलेगावकर, नरवाडे पाटील, गोविंदराव पांढरे, रामचंद्र पा मांजरमकर, स्वप्निल पा कदम,यबँकेचे शाखाधिकारी शिवाजी पाटील बावणे, गायकवाड सर,कदम मॅडम, बँकेचे खातेदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या