कावलगूडा खरेदी विक्री संघावर गंगाधर ताटे यांची तर ; कावलगुडा (बुद्रुक) खरेदी-विक्री संघावर गंगाबाई ताटे यांची बिनविरोध निवड !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
(कारेगाव फाटा)- कावलगूडा बुद्रुक तालुका उमरी येथील सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाची बैठक चेअरमन गोविंद पाटील शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीत सर्व सदस्य हजर होते. खरेदी विक्री संघ उमरी प्रतिनिधी म्हणून श्रीमती गंगाबाई ताटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीत संचालक गोविंद पाटील शेवाळे, आप्पाराव पाटील कदम, माधव मेथकूलवार, बाबुराव ताटे, श्रीमती गंगाबाई दिलीप दुधाडे, कोंडीबा रोडेकर, प्रलाद गाडे आदि सर्व संचालक हजर होते.
या बैठकीत गंगाबाई ताटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड करण्यासाठी बाबुराव पाटील, बाळासाहेब ताटे, मारुती पाटील, शेषराव रोडेकर, दत्ता पाटील, रत्नाकर पाटील हंबर्डे आदींनी परिश्रम घेतले.

                 *वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज*

            www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या