पंधराव्या वित्त आयोग 2023 अंतर्गत ग्रामपंचायत कावलगुडा बु ता. उमरी तर्फे कावलगडा बु येथिल शाळेस चांगल्या दर्जाचे दोन कपाट, टेबल, उत्कृष्ट दर्जाचे झेरॉक्स मशीन देण्यात आले.

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधि – आनंद सुर्यवंशी ]
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावलगुडा बु येथे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. पंधराव्या वित्त आयोग 2023 अंतर्गत ग्रामपंचायत कावलगुडा बु ता. उमरी तर्फे कावलगडा बु येथिल शाळेस चांगल्या दर्जाचे दोन कपाट, टेबल, उत्कृष्ट दर्जाचे झेरॉक्स मशीन देण्यात आले. तसेच कावलगुडा बु अंगणवाडी ला देखील एक कपाट, धान्य साठवण्यासाठी धान्याच्या कोठ्या देण्यात आल्या.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावलगुडा बु येथे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.या कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायतचे सरपंच माननीय सौ. ब्राह्मनंदा भुत्ते ताई,ग्रामविकास अधिकारी श्रीमती मुपडे मॅडम यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावलगुडा बु चे मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व अंगणवाडी सेविका यांच्याकडे या वस्तू सुपूर्त करण्यात आल्या.
यावेळी कावलगुडा(बु) ग्रामपंचायतचे सरपंच माननीय सौ. ब्राह्मनंदा भुत्ते ग्रामविकास अधिकारी सौ .मुपडे मॅडम, जेष्ठ पत्रकार सन्माननीय बाबुराव भुत्ते, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय सुधाकर पाटील दुगाडे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय प्रकाश पाटील ताटे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शेवाळे सर, माजी सरपंच माननीय चांदू रोडेकर, अंगणवाडी सेविका इंदुताई ताटे, ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक कुडकेकर सर , सहशिक्षक निवडुंगे सर, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक कुडकेकर सर यांनी केले ,तर कार्यक्रमाचे श्री निवडुंगे सर यांनी आभार मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या