मुंबईत पुन्हा गाजला “कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा शोभुन दिसतो का नोटावर किती शोभला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर – आवाजाचा बादशाह श्याम गायकवाड नरसीकर
मुंबईत पुन्हा गाजला “कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा शोभुन दिसतो का नोटावर किती शोभला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर – आवाजाचा बादशाह श्याम गायकवाड नरसीकर
आवाजाची देणगी जरी नैसर्गिक असली तरी मुंबईच्या चैत्यभूमीवर वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत गाण्याची पुण्याई ही केवळ बाबासाहेबाची असल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील नरसी येथील रहिवासी असलेले महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक मधुर आवाजाचा बादशहा श्याम गायकवाड नरसीकर यांच्या गोड आवाजाने मुंबईची चैत्यभूमी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नरसी चा आवाज मुंबईत गाजला असल्याची नांदेड जिल्ह्यात वा-या सारखी चर्चा होत आहे.
नायगाव तालुक्यातील नरसी येथील रहिवासी असलेले सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे लाडके गायक व मधुर आवाजाचा बादशहा श्याम गायकवाड नरसीकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने जय भारत माता सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष ओम श्री श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या वतीने मुंबई चैत्यभूमी व विरार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे विराट आयोजन केले होते शेषनाग लिंग मल्लिनाथ महाराज यांच्या आश्रमात जयंती साजरी करण्यात आली यावेळी लाखो भीमसैनिकांचे आपल्या गीताच्या माध्यमातून गायकवाड यांनी मने जिंकली आहे.
सुप्रसिद्ध गायक श्याम गायकवाड नरसीकर यांच्या गोड आवाजातून—
“कायदा भीमाचा पन फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर, किती शोभाला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर !
खरा देशप्रेमी ठरला भीम घटनाकार, विध्येलाही पुरून उरला असा विद्याधर, देशा सावरल, त्या गांधीला तारल, पेणाच्या त्या टोकावर, किती शोभाला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर !
राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते, त्यात एक महान माझे भीमराव नेते, ना कधीच हरले मागे ना सरले, केला इशारा त्या बोटावर, किती शोभाला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर !
सत्यहित सर्वांचे भीमानेच पाहिले, म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले, मित्तल अंबानी ऋणी भीमाचे थोर उपकार टाटा वर, किती शोभला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर !
कोटी कोटी ह्या दिनांचा भीम वाली ठरला, बहुजनांच्या हितासाठी देशोदेशी फिरला, अमोल किर्ति गाजे भुवरती सर्वांच्या या ओठावर, किती शोभाला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर !
कायदा भीमाचा पन फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोटावर किती शोभाला असता भीम नोटावर टाय आणि कोटावर हे गीत सादर करून मुबंई गाजवली आहे”.
“” या पुर्वी 23 मार्च 2020 बेंगलोर, 23 मार्च 2021 हैद्राबाद, 23 मार्च 2022 तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली.23 मार्च 2023 खटकर कलान पंजाब, 14 एप्रिल 2022 ताल कटोरा स्टेडियम नवी दिल्ली, 14 एप्रिल 2023 चैत्यभूमी मुंबई, ईत्यादी ठिकाणी आपल्या मधुर आवाजात गायन केले आहे.”
यावेळी वैजनाथ झलकी, दासराव हंबर्डे, सिद्धार्थ तलवारे, बालाजी बिराजदार, मलू भाऊ सारवाड, आरुण भाऊ, उमेश भाऊ, प्रकाश इंगळे, संतोष बोने, सुनील घाले इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy