तेलंगना मुख्यमंत्री मा.श्री.के.चंद्रशेखरराव (के.सी.आर.) यांच्या भाषणातून शेतकऱ्यांना विज, पाणी, पिकाला योग्य हमी भाव यासह विविध योजना देण्याचे आश्वासने !

के.सी.आर. यांच्या हस्ते बि.आर.एस.मध्ये अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश..

(बिलोली ता.प्र – सुनिल जेठे)
नांदेड येथे अबकी बार किसान सरकार म्हणत पक्ष प्रवेश सोहळा दि.५ फेब्रुवारी रोजी गुरुद्वारा सचखंड बोर्ड मैदानावर आयोजित कार्यक्रमात भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगना मुख्यमंत्री मा.श्री.के.चंद्रशेखरराव (के.सी.आर.) यांनी आपल्या भाषणात अबकी बार किसान सरकार म्हणत बि.आर.एस.ला बहुसंख्यने जागा मिळाल्यास, तेलंगनातील शेतकऱ्यांना असलेली सुविधा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विज, पाणी, पिकाला योग्य हमी भाव यासह विविध योजना देण्याचे आश्वासन  दिले. यामुळे सभेतील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला.


सदरिल कार्यक्रमात सर्व प्रथम महापुरुषांना श्री.के.चंद्रशेखरराव (के.सी.आर.) यांच्या हस्ते पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले. पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्यासह तेलंगना नेत्याच्या उपस्थिती मध्ये तेलंगना मुख्यमंत्री मा. श्री.के.चंद्रशेखरराव (के.सी.आर.)यांच्या हस्ते जिल्हा नगर परिषद सदस्य बंडूजी आलाम, सरपंच लक्षण गावडे, अजयजी आतराम, सुरज गावडे, उमेश महुरले, नगरसेविका भवानीताई गागापुरकु यासह एम.आय.एम. चे माजी बिलोली ता.अध्यक्ष मा. साजिद कुरेशी यांनी बि.आर.एस.मध्ये पक्ष प्रवेश केला.

यावेळी पक्ष प्रवेश सभा मंचावरील नेतेगन, खासदार मलकाज गिरी, विधान सभेचे आमदार मा.हणमंतराव मायनमपल्ली, आमदार मा.शकिल, यांच्यासह मा.वरवंटकर, देवेंद्र अन्ना, पञकार राजु पाटील शिंपाळकर यांची उपस्थिती होती.

मलकाज गीरी विधान सभेचे आमदार मा.श्री.हणमंतराव मायनमपल्ली यांची भेट मास महाराष्ट्र न्युज चे बिलोली ता.प्र.सुनिल जेठे यांनी घेतली. यावेळी तेलंगनातील जिल्हा प्रमुख मा.देवेंद्र अन्ना याच्यासह पञकार शेख युनुस कासराळीकर, सय्यद रियाज यांनीही भेट घेऊन चर्चा केली.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या