केंद्रीय जल योजना राबविण्यात गुत्तेदाराकडून मनमानीमुळे गावातील रस्त्याची दुरावस्था: होणाऱ्या त्रासामुळे गावकरी संतापले

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
बिलोली तालुक्यातील बावलगाव येथे केंद्रीय हर घर नल योजनेअंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून गावातील प्रभाग क्र. १,२ ३ मधील वार्डामध्ये नळाचे पाईपलाईन जोडण्यासाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून पाईप टाकण्याचे काम केले, काही ठिकाणी जोडणी झाली तर काही ठिकाणी घरापर्यंत पाईप जोडणीचे कामे झालेली नाहीत.

सध्या पावसाळाचे दिवस असल्याने रस्त्यावर पाणी साचून मोठ्या प्रमाणात चिखल होत आहे आणि दुचाकी व इतर वाहने सुध्दा येणे कठीण बनले आहे. रस्त्याची अवस्था बकाल झाल्याने गावातील नागरिकांना, महिलांना व लहान बालकांना चिखलातून पायी चालणे देखीलअवघड झाले आहे.

केंद्रीय जल योजना

रस्त्यावरील चिखलकामुळे गावकऱ्यांना बी-बियाणे आणताना, लहान बालकांना शाळेत जाणे खराब झालेल्या रस्त्यामुळे अडचणी येत आहेत.गावातील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असून. संबंधित काम करीत असलेल्या गुत्तेरादाराला रस्त्याचे काम त्वरीत करण्याची गावकऱ्यांनी विनंती केली तरी ते रस्ता तयार करण्याचे काम आमच्याकडे नाही,असे केवळ तिन्ही वॉर्डमध्ये पाईपलाईन टाकून घरोघरी जोडणी करण्याचे काम आम्हच्याकडे आहे रस्ता पुन्हा पूर्ववत करण्याची जबाबदारी आमची नाही, आम्हाला काही विचारायचे नाही, अशी उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये कामाच्या दुरावस्थेबद्दल प्रचंड नाराजी व तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बावलगावमधील नळपाणी योजनेअंतर्गत होत असलेल्या पाईपलाईचे काम करीत असताना रस्त्याची केलेली दुरावस्था त्वरीत रस्त्याची पुनर्बांधणी करून पूर्ण करावी अशी मागणी गावकर्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Www.massmaharashtra.com 
#रस्ता #मास_महाराष्ट्र

ताज्या बातम्या