जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार, माजी आमदार भाई केशवराव धोंडगे यांचा लोहा शहरात भव्य नागरी सत्कार संपन्न !

[ विशेष प्रतिनिधी / रियाज पठान ]
         जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार,माजी आमदार भाई केशवराव धोंडगे यांचा शतकोत्सवानिमीत्त नांदेड हून लोहा शहराकडे येतांना नांदेड, जानापुरी, सोनखेड, आंबेसांगवी, कारेगाव, पारडी सह लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून संपुर्ण शहरात विविध ठिकाणी नागरी सत्कार मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
      हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला, तब्बल चार ते पाच दशके ज्यांनी कंधार-लोहा मतदारसंघाचे शेकापचे प्रतिनिधित्व केले अशा समाजकारणी, राजकारणी, पत्रकार, साहित्यिक, विपूल लेखन संपदा असलेल्या, विविध पुरस्कारांनी सन्मानीत असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार माजी आमदार भाई केशवराव धोंडगे यांचा लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नागरी सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्सवानिमित्त कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सार्वोभौम सभागृहात दि.२४ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांच्या सत्कार सोहळा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
तद्नंतर भाई केशवराव धोंडगे आपल्या सहकाऱ्यांसह दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी नांदेड-लोहा मार्गे क्रांतीभुवन बहाद्दरपुरा येथे जात असताना जानापुरी,सोनखेड,आंबेसांगवी, कारेगांव,पारडी सह लोहा शहरात प्रवेश करतांनाच प्रथमतः आपल्या सहकाऱ्यांसमवेत भाईंचे आगमन होताच शहरवासीयांच्या वतीने आपल्या सहकाऱ्यांसमवेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार रोहिदास रावजी चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या वतीने डॉ. भाई केशवराव धोंडगे यांना माजी नगराध्यक्ष आशाताई रोहिदास चव्हाण यांनी औक्षण (ओवाळणी) करून दीर्घायुष्य चिंतीले व क्रेनच्या साहाय्याने तुळशी व गुलाब पुष्प हाराने व युवासेना कार्यकर्ते यांनी खारीक खोबरे चा हार घालून माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी आपल्या सर्व नगरवासीयांच्या समवेत भव्य दिव्य स्वागत केले.
          यावेळी नगरसेवक संभाजी चव्हाण,सोनी साडी सेंटरचे ज्ञानोबा कोटगिरे, नगरसेवक भास्कर पाटील पवार, भारत पवार आदींनी सत्कार केला.त्यानंतर धनसडे हॉस्पिटल समोर डॉ. मिलिंद धनसडे केशवराव चव्हाण, दिनेश तेललवार , हरिभाऊ चव्हाण, विठ्ठूभाऊ चव्हाण, संजय मक्तेदार, उपनगराध्यक्ष दत्ता भाऊ वाले, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल आदींनी सत्कार केला.
लोहा नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी व सर्व नगरसेवकांच्या वतीने नगरपालिकेमध्ये भव्य नागरी सत्कार पार पडला.
     याचबरोबर लोहा तालुका काँग्रेस कमिटी तर्फे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, काँग्रेस शहराध्यक्ष वसंत पवार, माजी उपनगराध्यक्ष व्यंकटेश संगेवार, माजी नगरसेवक उत्तम महाबळे आदींनी सत्कार केला.
तसेच यानंतर भाई केशवरावजी धोंडगे यांनी श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील हुतात्मा स्मारकांना वंदन करून ते कंधारकडे रवाना झाले. भाईंच्या विधिमंडळात झालेल्या सत्कार नंतर लोहा शहरात पुन्हा एकदा सर्व नागरिकांच्या वतीने भाईंचा जोरदार सत्कार करत पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यभर केलेल्या कार्यास झळाळी दिली.
महाराष्ट्र शासनाने जस्ट स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार माजी खासदार डॉ.भाई केशवरावजी धोंडगे यांच्या आयुष्यभर केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांचा गौरव केल्याने पुन्हा एकदा लोहा कंधार शहरासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची मान उंचावली आहे. सदरील भव्य नागरी सत्कारात भाई केशवरावजी धोंडगे यांच्या समवेत बारकाईने लक्ष ठेवून असलेले डॉ.भाई पुरुषोत्तम धोंडगे त्यांचे सर्व चाहत्यांकडून व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या