बिलोली येथे बुरुड समाज बांधवांच्या वतीने ; श्री.संत केतय्या स्वामी महाराज याची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी.

🔴 श्री.संत केतय्या स्वामी महाराज यांच्या जयंती निमित्त वैद्यकीय अधिक्षक मा.नागेश लखमावार यांचा सत्कार.   
(बिलोली प्र.- सुनिल जेठे)
बिलोली शहरातील बुरुड समाज बांधवांच्या वतीने दि.१० डिसेंबर २०२२ रोजी श्री.संत केतय्या स्वामी महाराज यांंची जंयती साजरी करण्याचे योजिले असता उप जिल्हा रुग्णालय बिलोलीचे अधिक्षक मा.नागेश लखमावार यांनी श्री.संत केतय्या स्वामी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन जयंती साजरी करण्यात आली.

 सदरिल श्री.संत केतय्या स्वामी महाराज हे बुरुड समाजबांनी धर्म गुरु मानले असल्यामुळे बिलोली शहरातील बुरुड समाजातील युवक पिढी सुशिक्षित निघाल्यामुळे आपल्या धर्म गुरु बद्दल आदर करुन श्री.संत केतय्या स्वामी महाराज याची जयंती मान्यवरांच्या हस्ते साजरी करुन मान्यवरांच्या उपस्थितीत बालकांना फळे व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
श्री.संत केतय्या स्वामी महाराज यांच्या जयंती निमित्ताने न.प.चे नगरसेवक शंकर मावलगे यांनी बुरुड समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून वेळू पासुन नागरिजिवनात वास्तू वापरात येणाऱ्या वस्तू बद्दल व त्यांच्या उपजीविका बद्दल मनोगत व्यक्त केले,तदनंतर भाजपाचे युवा तालुका अध्यक्ष मा.इंद्रजित तुडमे यांनी ही आपले मनोगतातून बुरुड समाज युवा पिढी संच केतय्या स्वामी महाराजांची कार्याची जान ठेवून आपल्या व्यवसाय करत पुढे जावे,व कुठल्याही वेसणाच्या बळी न पडता,निरवेसणी होऊन आपले जीवन व युवा पिढी सुधरावे या प्रत्येकांनी विचार करावा असे मत मांडले.
यावेळी बिलोली उपरुग्णालयाचे मा. नागेश लखमावार,भाजप युवा ता.अध्यक्ष मा.इंद्रजित तुडमे, माजी नगरसेवक शंकर मावलगे, माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार, पञकार सय्यद रियाज, सुनिल जेठे,लिंगूराम ठक्करोड, आनंद बालाजी गुडमलवार, तुळशिराम गंगाराम, किशोर नागेश्वर, छञाजी नागेश्वर, मारोती पोरगेवार, रमेश गुडमलवार, अनिल गुडमलवार, नारायण पोरगेवार, रमेश आकुलवार, पोशट्टी पोरगेवार, गंगाधर सुलेवार, शंकरगुडमलवार यांच्यासह अदी उपस्थित होते.

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या