खैराजंली हत्याकांड एक निंदनीय क्रुर घटना – जेष्ठ पत्रकार एल ए हिरे यांचा लेख

( एल.ए.हिरे )
आपल्या देशाला लोकशाही,स्वातंत्र्य मिळूनही धर्म आणि जातीव्यवस्थेच्या नावाखाली आजही मागासवर्गीय बहुजन समूहावर अन्याय अत्याचार खून बलात्काराच्या गंभीर घटना घडतांना दिसत आहेत.भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात दि.29 सप्टेंबर 2006 रोजी क्रूर अशी मन सुंन्न करणारी निंदनीय मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली होती.
या गावातील राक्षसी नराधमानी केवळ जातीय द्वेषभावनेतून भय्यालाल भोतमांगे कुटुंबातील चार जणांना निर्दयीपणे एकेकास ठेचून ठेचून ठार मारले आहे. हे राक्षसी कृत्य करतांना निष्पाप लहान कोवळ्या बालकांना ठार मारतांना या नराधमांना दयामया आली नाही!
हे दुष्कर्ते करतांना कोणता देवही का धावून का आला नाही.?आला नसेल तर देवावर विश्वास कसा ठेवला जातो?
कारण होते भोतमांगे हा कांही सवर्ण लोकांना आपल्या शेतातून रस्ता देत नव्हता तर कुद्री गावचे पोलीस पाटील सिद्धार्थ गजभिये यांचे गावातील कांही लोका सोबत भांडण झाल्याने पोलीस पाटील यांना मारहाण केली असता भैय्यालालची पत्नी सुरेखा व मुलीने साक्ष दिल्यामुळे मारहाण करणार्‍या लोकांवर कारवाई होऊन अटक झाल्याने ते भोतमांगे कुटुंबीयांचा राग मनात धरून होते गावातील हिंदूत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या लोकांच्या जमावाने दि.29 सप्टेंबर 2006 रोजी भय्यालालच्या घरावर चाल करून गेले प्रथम त्याचे घर पेटवून दिले.
नंतर जमावाने भोतमांगे यांची पत्नी सुरेखा ही जीव मुठीत धरून पळून जाताना तिला पकडून लाठ्या काठ्या कुर्‍हाडी चैनेने बेदम मारहाण करून ठार मारले व एका नाल्यात फेकून दिले तर सुरेखाचा पदवीधर झालेला मुलगा सुधीर हा जीव वाचवण्यासाठी आकांताने आरडाओरड करीत पळत सुटला असता त्यालाही पकडून ठेचून ठेचून ठार मारण्यात आले या माथेफिरूनी एवढ्यावरच न थांबता त्यांनी भोतमांगे कुटुंबातील अंध अपंग असलेल्या रोशन नावाच्या मुलालाही सोडले नाही. त्यालाही ठेचून मारले तर शिक्षणात हुशार असलेली प्रियंका या विद्यार्थिनीलाही सोडले नाही.राक्षसी वृत्तीच्या रानटी हैवानांनी अमानूषपणे तिलाही कुर्रूर्रपणे हालहल करून नको ते कृत्य करीत ठेचून ठार मारले आहे.काय असा गुन्हा केला होता कोवळ्या मुला मुलींनी!
ठार मारलेल्या चौघांचे मृतदेह एका बैलगाडीतून गावाबाहेर नेवून एका नाल्यात फेकून दिले.
अंगावर शहारे आणणार्‍या चितथराक घटनेने देश हादरून गेला होता.आंबेडकरी तरुण कोणत्याही नेत्यांचा सहारा न घेता रस्त्यावर उतरली होती उभा महाराष्ट्र आंदोलनाने पेटून टाकला होता.47 आरोपींपैकी अकरा जणांवर आरोपपत्र सिद्ध झाले त्यातील आठ जणांना 2008मध्ये फाशीची शिक्षा झाली तर इतरांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती नंतर फाशीच्या शिक्षेचे रूपांतर उच्च न्यायालयाने जन्मठेपेत केले.
दोघांचा जेलमध्ये मृत्यू झाला घटनेनंतर फक्त भय्यालाल हे बाहेर असल्याने बचावले होते संसार उध्वस्त झाला!पोटचे गोळे पत्नी गेल्यानंतर ही त्यांनी मोडेन पण वाकणार नाही या बाण्याने शरणांगती न पत्करता गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे! म्हणून झगडत असतांना भय्यालाल यांचाही दि.20 जानेवारी 2017 रोजी दुखद निधन झाले.
“गर्व से कहो म्हणणाऱ्यानो अशा संताप जनक घटनेने मन सु:न होतय!

विषमतावादी धर्माचा पुरस्कार करणाऱ्यांनो थू तुमच्या जिंदगीवर माणसे असूनही जनावरा प्रमाणे वागता! तुम्ही तुमच्या धर्मातील जातीय विषमता संपवा समाजात जावून हिंदु धर्मियांच प्रबोधन करून सर्वांना मानवतेचा संदेश द्या!हिंदुत्ववा मध्ये बंधुत्व निर्माण करा तरच तुम्ही या देशाचे खरे नागरिक आहात अन्यथा तमच्यात कांहीं तरी भेसळ आहे.
धिक्कार असो माणुसकी हरलेल्या खैराजंलीतील निंदनीय घटनेचा! भोतमांगे कुटुंबियांना विनंम्र अभिवादन!🌹🙏🏻

– एल.ए.हिरे – सामाजिक कार्यकर्ता पत्रकार
भोकर/नांदेड 9049379557/9421763109

ताज्या बातम्या