घुंगराळा येथील खंडोबा यात्रेतील विशेष आकर्षण असणाऱ्या कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या असून या कुस्ती स्पर्धेत वाशिम चा पैहलवान विजय शिंदे याने दिल्लीच्या मनीष कुमार यांच्यावर मात करत कै. माधवराव पा.सुगावे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांच्या तर्फे असणारे बक्षीस खंडोबा केसरी रु. २१,१११ रुपयांचे बक्षिस पटकावले.
सदर कुस्ती स्पर्धेत हरियाणा, पंजाब,दिल्ली, यवतमाळ, वाशीम, कोल्हापूर, सातारा या सह नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणचे अनेक मल्ल कुस्ती खेळण्यासाठी आले होते..
सदर कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सरकारच्या आयुष विभागाचे संचालक तथा घुंगराळ्याचे भूमिपुत्र डॉ. रामन यलपलवाड, व कुंटूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील,गटविकास अधिकारी वांजे साहेब, महिला व बालकल्याण समितीचे सदस्य किशोर नावंदे, एम एस इ बी चे अभियंता जाधव साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी एक वाजता कुस्ती स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. या कुस्ती स्पर्धेत अंदाजे २०० ते २५० लहान ते मोठ्या वयोगटातील कुस्त्या लावण्यात आल्या, रात्री ९ वाजेपर्यंत सदर कुस्त्यांचा डाव सुरूच होता. कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी ५ ते १० हजार कुस्ती शौकीनांची उपस्थिती होती..
या कुस्ती स्पर्धेला नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप साहेब यांनी सायंकाळी भेट देऊन तास भर कुस्ती स्पर्धा पाहण्याचा आनंद घेतला व मल्लांशी चर्चा करून आनंद व्यक्त केला..
कुस्ती स्पर्धेचे बक्षीस वितरणाचे कामकाज माजी विस्तार अधिकारी बालाजीराव मातावाड, ग्रामविकास अधिकारी सूर्यकांत बोंडले, शिवाजी पा.ढगे, श्यामराव यमलवाड यांनी पाहिले..
या वेळी या वेळी गावचे ज्येष्ठ नागरिक केरबा पा. सुगावे, संभाजीराव तुरटवाड, ग्रामविकास अधिकारी हणमंतराव शिंदे, माजी विस्तार अधिकारी दंडेवाड साहेब, मारोतराव कंचलवाड, बालाजीराव हाळदेवाड,शंकर मामा यलपलवाड, मा.उपसरपंच शेषेराव पा. ढगे, ग्रा.पं.सदस्य प्रतिनिधी व्यंकटराव कंचलवाड, माधवराव पा. ढगे, प्रल्हादराव पा. ढगे,साईनाथ पा. सुगावे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माधव पा. ढगे, ग्रा. पं. सदस्य गंगाधर सूर्यवंशी, व्यंकटराव कंचलवाड, गोविंदराव पा. शिंदे, विठ्ठलराव माधवराव यमलवाड, तंटामुक्ती अध्यक्ष श्याम पा.ढगे, प्रल्हाद बोधनकर, अच्युतराव पांचाळ, श्रीराम पा. सुगावे, माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाधर पा. ढगे, ग्रा. पं. सदस्य गंगाराम सूर्यवंशी, गंगाधर पा.सुगावे, बालाजी पा. ढगे, ग्रा.पं.सदस्य बंटी यलपलवाड, विलास पा. सुगावे, ग्रा.पं.सदस्य प्रतिनिधी रोहिदास पा. ढगे, मा. ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी मुरहारी तुरटवाड, राम पा. सुगावे,मा. ग्रा.पं. सदस्य प्रतिनिधी गंगाधर पांचाळ, सूरज पा. सुगावे, साईनाथ पा.सुगावे, माधवराव जलदेवार, शंकर यमलवाड, राजेश पा. ढगे, विलास पा. ढगे, प्रदीप पा.सुगावे, शंतनू पा. ढगे, योगेश पा. ढगे, उमेश पा.कदम, आदींनी कुस्ती स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.. !!
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy