खपराळा येथे बार्टी च्या वतीने संविधान साक्षर अभियान संपन्न !
[ प्रतिनिधी – गौतम वाघमारे ]
समाजातील जातीय विषमता नष्ठ करून बंधुभाव निर्माण व्हावा व सर्व समाजात समाणता रूजावि हा उद्वेश असुन सकारात्मक नजरेने पाहने गरजेचे आहे. अट्रोसीटी कायदा समाजात समानता आणण्यासाठीच आहे. असे आवाहन समतादुत दिलीप सोंडारे यांनी केले.
दि. 21 जानेवारी रोजी मौ.खपराळा येथे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टि ) च्या वतीने संविधान साक्षर अभियान 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी पर्यंत समतादुत प्रकल्पाच्या वतीने राबविण्यात येत असुन, याचाच एक भाग म्हणुन सदर प्रबोधन कार्यक्रमा चे आयोजन ग्राम पंचायत च्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.शांताबाई सोनकांबळे ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन समतादुत दिलीप सोंडारे व समतादुत शारदा माळे ह्या होत्या. व्यासपिठावर गणेश पा.बोगरे, तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पा.बोगरे, पो.पा.रमेश पा.हिवराळे, पत्रकार गौतम वाघमारे, तेजेराव पा.बोगरे, माणीक पा.बोगरे, बाबु पा.हिवराळे, अंकुश पा.हिवराळे, दत्तराम पा.हिवराळे, नरशिंग तडकोकुलवार, गुलाब पा.बोगरे, रामेश्वर पा.हिवराळे ईत्यादी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरीक महिला उपस्तीथ होते.