माजी खासदार खतगावकर व बेळगे यांची सदिच्छा भेट

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव बेळगे यांच्या निवासस्थानी जिल्ह्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी सदिच्छा भेट घेतली गेल्या आठवड्यात माधवराव बेळगे यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबई येथे यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते नायगाव येथील बेळगे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. 
त्याच्या सदिच्छा भेटीसाठी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे बेळगे परिवाराचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे माधवराव बेळगे यांच्या भेटीसाठी रविवारी सकाळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे कार्यकर्त्यांसह बेळगे यांच्या निवासस्थानी दाखल होऊन विचारपूस केली यावेळी माजी आमदार तथा नांदेड जिल्हा बँकेचे चेअरमन वसंतराव पाटील चव्हाण, केशवराव पाटील चव्हाण, नगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, संजय आप्पा बेळगे, सय्यद रहीम शेठ, राजू गांदिगुडे ,गजानन चौधरी, शेटकर ,वाघमारे, श्रीनिवास गडपल्लेवार, नंदा देसाई अदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या