खेड तालुक्यांमध्ये विजेचा खेळ खंडोबा !

(जिल्हा प्रतिनिधी रत्नागिरी-रजनीकांत जाधव)

खेड तालुक्यांमध्ये शहरी भाग वगळता 127 गावे आहेत.सह्याद्रीच्या टोकापासून पन्हाळजे पर्यंत विस्तारलेला हा तालुका आहे.

डोंगरदऱ्यांमध्ये खेडी गावे वसलेली आहेत. अशा परिस्थितीत महावितरणची वीज नेहमी जाते परंतु त्याचा विचार न करता भरमसाठ बिले आकारली जातात.

तेथील ग्रामस्थ रोजंदारी करीत असतात आणि आपली उपजीविका भागवतात.

घरामध्ये कमावणारा एक असतो आणि कुटुंब फार मोठे असते त्यातच मुलांचे शिक्षण आजारपण दररोजची लागणारी शिदोरी हा सर्व भार मजुरीतूनच ही लोक उचलतात.

अशा परिस्थितीमध्ये आठवड्यातून एक ते दोन वेळा विज महावितरणकडून बंद केली जाते. त्यामुळे खेड तालुक्यातील जनता त्रस्त झालेली आहे. त्याच प्रमाणे विजेचा स्लॅब दहा ते बारा रुपये आकारला जातो त्यामुळे भरमसाठ बिले येतात.

काही ठिकाणी महावितरणाचा अजब कारभार दिसून येतो उदाहरणार्थ बंद घरे असून देखील दहा वीस हजार रुपये बिलं आलेली आहेत.चौकशी करायला गेल्यानंतर महावितरण अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात.

तसेच रात्रीच्या वेळी दोन-तीन तास लाईट बंद केली जाते. अशाप्रकारे ती वीज सेव करून उद्योगधंदे आणि हॉटेल यांना पुरवली जाते अस जनतेत बोलल्या जात आहे.

त्याचा भार ग्रामीण भागातील जनतेवर बिले वाढवून ती जनतेच्या बिलांमध्ये आकारले जातात.अस लोकांच म्हणणं आहे. 

तरी खेड तालुक्यातील व सर्व तालुक्यातील जनतेची मागणी आहे की सतत वीज बंद करू नये,असे केल्यास जनतेच्या उग्र संतापाला सामोरे जावे लागेल असा इशारा जनते कडून दिला जात आहे.

ताज्या बातम्या