कुंडलवाडी सोसायटी निवडणुकीत चुरस वाढणार ; स्थानिक काँग्रेस व भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक 16 एप्रिल रोजी पार पडणार असून या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत असलेल्या कुंडलवाडी पुनर्विकास सेवा सहकारी सोसायटी या पॅनलला ‘कपबशी’ तर काँग्रेस पुरस्कृत गोदावरी विकास पॅनलला ‘ऑटो’ ही निवडणूक निशाणी देण्यात आल्यामुळे आता निवडणुकीत चुरस वाढण्याचे चित्र दिसून येत आहे.
           कुंडलवाडी येथील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक ही दिनांक 16 एप्रिल रोजी पार पडणार असून या निवडणुकीत काँग्रेस व भाजपा पुरस्कृत पॅनलचे 13 जागेसाठी 25 उमेदवार रिंगणात उभे आहेत, त्यामध्ये काँग्रेसच्या गोदावरी विकास पॅनलच्या माध्यमातून सर्वसाधारण गटातून अर्जुने प्रकाश, कोटलावार हणमल्लू, टेकाळे गणपत, दीडशेरे चक्रधर, पाटील माधवराव, बेजगमवार सुनील, गंगोणे संजय, महिला प्रतिनिधी जोगदंड प्रसूशाबाई, धुरपतबाई गट्टूवार, इतर मागास प्रवर्ग खेळगे गंगाधर, विमुक्त मागास प्रवर्ग होरके लक्ष्मण, अनुसूचित जाती/ जमाती कोमुलवार दत्ता, तर भाजप पुरस्कृत कुंडलवाडी पुनर्विकास विविध सेवा सहकारी सोसायटी या पॅनलच्या माध्यमातून सर्वसाधारण गटातून अहमदमिया दाऊदमिया, कदम नागोराव, कुडमूलवार विठ्ठल, कोटलावार शिवराम, परसुरे शंकर, पुप्पलवार पंढरी, बोंमले संभाजी, शिरगिरे पिराजी, महिला प्रतिनिधी पोरडवार शोभा, इतर मागास प्रवर्ग शिवशेट्टे संतोष, विमुक्त मागास प्रवर्ग भोरे साईनाथ, अनुसूचित जाती/जमाती डॉ एस एस शेंगुलवार आदी उमेदवार रिंगणात उभे आहेत.
               काँग्रेस पुरस्कृत पॅनलला निवडणूक निशाणी ऑटो तर भाजपच्या पॅनलला कपबशी अशी निशाणी देण्यात आली आहे,या निवडणुकीत शहर व ग्रामीण भागातील 1576 मतदार असून निवडणुकीची रणधुमाळी ग्रामीण व शहरी भागात सुरू झाली आहे..असे असले तरी कुंडलवाडी पुनर्विकास विविध सेवा सहकारी सोसायटी पॅनलच्या महिला प्रतिनिधी कांचरवार विजयालक्ष्मी भुमरेड्डी यांनी नामनिर्देशन पत्र उचलण्याच्या शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज उचलून घेतल्यामुळे भाजपा पुरस्कृत पॅनलला धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांचे 13 पैकी 12 उमेदवारच आता रिंगणात असल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनल वरचढ होताना दिसून येत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या