येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक हे दिनांक 16 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजे पर्यंत पार पडली आहे,या निवडणुकीत एकूण 1576 मतदारांपैकी 1259 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.या निवडणुकीसाठी एकूण चार बूथ ठेवण्यात आले होते,त्यापैकी बुथ क्रमांक एक वर 394 मतदार यापैकी 322, बूथ क्रमांक दोन 394 पैकी 316,बुथ क्रमांक तीन 398 पैकी 313, बुथ क्रमांक चार 354 पैकी 308 असे एकूण 1259 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत गोदावरी विकास पॅनल व सोसायटी पुनर्विकास पॅनल या पॅनलमध्ये अतीतटीची लढत झाली असून या लढतीतील सर्व 25 उमेदवारांच्या निकालाचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले असून त्यांची मतमोजणी सायंकाळी पाच वाजता सुरू होऊन रात्री उशिरा याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून आर जी उल्लेवार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राध्यक्ष म्हणून आर पी देगलूरकर,के डी गव्हाणे,बी पी तलरवार, पी जी पप्पूलवार, काम पाहिले तर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले,शिवप्रसाद कत्ते,पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले व त्यांचे सहकारी यांनी केले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy