सेवा सहकारी सोसायटी कारेगाव फाटा चेअरमन किशनराव पाटील यांचा वाढदिवस साजरा !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
किशनराव पाटील एक दानशूर व्यक्ती मत्व असून आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, मी जनतेचा सेवक असून जनतेची सेवा माझ्या हातून घडावी हिच इच्छा आहे.

गावातील सोसायटीचे लाभ धारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीन. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये करखेली गटातून भाजप पक्षाकडून उमेदवारी मागणार आहे, पक्षाने देखील उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले.
मी कारेगाव फाट्यावर आठवडी बाजार भरवण्यासाठी प्रयत्न केले. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अकरा गुंठे जमीन दान दिली. असे परिसरातील समाजासाठी, गोरगरिबांसाठी काम करीत आहे असेही ते म्हणाले.
कारेगाव फाट्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी फिल्टरचे मोफत पाणी पाजण्याचे पवित्र काम करीत आहे. त्यांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. म्हणून करखेली जिल्हा परिषद गटातून मतदार मला सेवा करण्याची संधी देतील असा आशावादही किशनराव पाटील जगदंबे यांनी व्यक्त केला.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या