कोलंबी बळेगाव उपसा सिंचन प्रकल्पाचे काम निष्कृष्ट दर्जाचे संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा बळेगाव प्रकल्पात जलसमाधी घेणार !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
  तालुक्यातील येथील कोलंबी बळेगाव उपसा सिंचन प्रकल्पाच्या पाईपलाईनचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पाण्याचे जागोजागी लिखित होऊन शेतकऱ्यांचे पिके वाळून जात असल्याने नुकसान होत असून शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था सुरळीत करून द्यावी व संबंधित गुत्तेदारावर व जबाबदार अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आम्ही सर्व शेतकरी बळेगाव प्रकल्पात जलसमाधी घेणार असल्याचे निवेदन अधीक्षक अभियंता नांदेड पाटबंधारे मंडळ व विष्णुपुरी प्रकल्प विभाग यांना शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे.

तालुक्यातील प्रत्येक शेतकरी सुजलाम सुफलाम होऊन सुखी व समाधानी झाला पाहिजे म्हणून शासनाने शंभर कोटी पेक्षा जास्त रुपये खर्च करून बळेगाव कोलंबी बंधारा निर्मिती केली परंतु भ्रष्ट अधिकारी व गुत्तेदार यांच्या संगणमताने काम निष्कर्ष दर्जाचे झाल्याने शेतकऱ्यात तीव्र नाराजी संताप व्यक्त होत आहे नायगाव तालुक्यातील कोलंबी बळेगाव सिंचन भागातील शेतीला बळेगाव बंधारा उपसा सिंचन प्रकल्पा मधुन पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा होतो. सध्या रब्बी हंगामाचे दिवस असल्यामुळे हरभरा, गहू, भूईमुग व इतर पाण्यावरील पिकाची लागवड केलेली आहे. त्या पिकाला पाणी देण्यासाठी पाणी अपुरं पडत आहे, कोलंबी उपसा प्रकल्पाचे करण्यात आलेले पाईप लाईनचे काम हे निकृष्ठ दर्जाचे झालेले आहे सदर पाईप लाईन हे जागोजागी लिकीज होऊन पाणी मिळत नाही व लिकीज होऊन लिकीज ठिकाणी शेकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आम्ही सदरील पाण्याच्या बळावर वरील पिकाची लागड केली परंतु आज पर्यंत आम्हा शेतकऱ्यांना एकही पाणी मिळालेले नाही. शासनाने लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची व्यवस्था केली तर त्यामध्ये संबंधीत कामाचे व जबाबदार अधिकारी यांनी मात्र थातुर मातुर काम करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.

 जर आपण याकडे गांभिर्याने लक्ष देऊन आम्हा शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था सुरळीत करून द्यावी व संबंधीत गुत्तेदारावर व जबाबदार अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा आम्ही सर्व शेतकरी बेळगाव प्रकल्पात जलसमाधी घेणार असा इशारा शेतकऱ्यांनी आपल्या नियोजनात दिला आहे. 
 यावेळी कांतराव हनुमंतराव निकलपुरे, रामराव मारुतीराव बामनपल्ले, प्रकाश शंकर जोंधळे (सरपंच ग्रा.पं लालवंडी) बालाजी केरबा बामनपल्ले, (माजी सरपंच लालवंडी) गोविंद लक्ष्मणराव संग्रपवार (सरपंच रानसुगाव) रावसाहेब शेषराव मोरे, शिवाजी बळीराम जाधव, युवराज अशोकराव लालवंडी, गणपत जळबा जोंधळे यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या