कोळगाव येथे अरूणकुमार सुर्यवंशी यांच्या हस्ते धम्मध्वज ध्वजारोहन करून  भीमजयंती साजरी !

सविस्तर वृत्त असे की, जगभरात कोरोणाने थैमान घातले असुन महाराष्ट्र प्रशासनाने घरीच राहुन भीमजयंती साजरी करण्याच आवाहन केलं होत.
नांदेड जिल्हयाचे जिल्हाधिकारी डाॅ.विपीन ईटनकर आणि पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी जयंतीच्या दिवशी कसल्याही प्रकारची रॅली न काढता आपापल्या घरी राहुन महामानवाला अभिवादन करावं अस आवाहन केलं होत.
त्याला प्रतिसाद देत कोळगाव येथील काही गावक-यांनी बौद्ध विहाराच्या जागेवरच मोजक्या जणांच्या उपस्थितीत प्रजासेना संघटना प्रमूख,  अरूणकुमार सुर्यवंशी यांच्या हस्ते धम्मध्वज ध्वजारोहन केले.

यावेळी माजी सरपंच गणेश दुधकर, बालाजी सुर्यवंशी, संतोष सुर्यवंशी, रंजीत सुर्यवंशी, विठ्ठल मदने, माधव सुर्यवंशी, प्रकाश सुर्यवंशी असे मोजके गावकरी उपस्थित होते. 

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या