कोळगाव येथील जि.प.शाळेच्या खोल्या मोडकळीस !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
कोळगाव, ता.बिलोली, जि.नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या मोडकळीस आल्या आहेत.

केंद्रप्रमुख दुगाव यांनी दिलेल्या अहवालानुसार शिक्षणविस्तार अधिकारी यांनी धोकादायक वर्गखोल्यात विद्यार्थी न बसवण्याबाबद २०१९ मध्ये आदेशीत केल आहे.

कोळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. बिलोली तालुक्यापासून जवळपास 15 किलोमीटरवर हे गाव असून मौजे कोळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दूर्दशा झालेले असून या शाळेत दोन वर्ग खोल्या असून कोणीही बसू नये अशा पद्धतीचे आदेश शिक्षण विस्तार अधिकारी यांनी दिलेले आहेत.
वस्तुस्थिती पाहता या शाळेत या शाळेत दोन वर्ग खोल्या व एक कार्यालय असून या दोन्ही वर्गाच्या भिंतीला तडा गेला आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विस्तार अधिकारी यांना माहिती मिळाल्यानंतर सदरील मुख्याध्यापकास त्यांनी आपला पत्र व्यवहार करून विद्यार्थ्यांना वर्गात न बसून देण्याचे आदेश काढले होते.
 या शाळेत पहिली ते चौथी वर्ग चालत असून अचानकपणे जोमाने पाऊस आल्यास या विद्यार्थ्याचे जीवितास धोकादायक होऊ शकते.  म्हणून सदरील विद्यार्थ्यांच्या पालकांचे असे मत आहे की, शासनाने ही शाळा व्यवस्थित रित्या डागडुजी करावी किंवा नवीन इमारत करावी.  अशी मागणी पालकातुन होत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे की नाही याबाबतीत सुद्धा भीती निर्माण होत आहे. वरील बाबीचा शासनाने त्वरित विचार करून विद्यार्थ्यांना नवीन इमारत बांधवावी व त्यांच्या जीवितहानी टाळावी. सन्माननीय लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तात्काळ ह्या वर्गखोल्या बांधुन देण्यासाठी प्रयत्न करावेत.

पावसाळ्यात ह्या मैदानात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून मुलांना शाळेत प्रवेश करण्यास अडचण होते. त्यासाठी पेव्हर ब्लॉक ची व्यवस्था देखील करावी. अशी मागणी गावक-यांकडून केली जात आहे.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या