कोल्हेबोरगाव येथे वैकुंठवासी श्री.व्यंकटराव नरसिंगराव शिल्पकार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम !

(विशेष प्रतिनिधी-साहेब सोनकांबळे)

कोल्हेबोरगाव ग्रामपंचायत कार्यालयचे तत्कालीन जेष्ठ वसूली कारकून श्री.व्यंकटराव नरसिंगराव शिल्पकार यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम 16/02/2021 मंगळवारी कोल्हे बोरगाव येथे साजरा होत आहे.

त्या निमित्ताने गावात भजन व ईतर कार्यक्रम आयोजित केले आहेत.

मृत्यू समयी त्यांच वय 72 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मीबाई शिल्पकार आणि तीन मुले नरेश शिल्पकार – विक्रीकर निरीक्षक अधिकारी, दिलीप शिल्पकार व शिवानंद शिल्पकार आणि सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

दि.16/02/ 2021 सायंकाळी 4:00 नंतर सहभोजनाचा कार्यक्रम असून, रात्री गावातील भजनी मंडळ यांच्यामार्फत भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास परिसरातील मित्रमंडळी व आप्त स्वकीयांनी येण्याची विनंती शिल्पकार परिवाराकडून करण्यात आली आहे.

मास महाराष्ट्र न्युज पोर्टल सत्य बातमी पोहचवण्यासाठी अग्रेसर.

ताज्या बातम्या