कोंडलापूर हद्दीतील मराठवाडा हाडाच्या कारखान्याच्या दुर्गंधीने नागरीक त्रस्त।  

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
मराठवाडा कारखान्याला परवाना नसतांना तेलंगणा राज्यातून दहा टायरच्या वाहनाने हाडांचा पुरवठा होत असुन, कारखान्याच्या परवान्याची चौकशी करुन कायदेशीर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी तहसिलदार यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल ।

बिलोली शहरा लगत मौजे कोंडलापूर हद्दीत गेल्या तीस वर्षापासुन अगोदरच तीन हाडाचे कारखाने असुन ह्या कारखान्याच्या लगत आनखी एक नव्याने गेल्या दोन वर्ष भरापासुन मराठवाडा हाडाचा कारखाना चालू झाला असुन या हड्डी कारखान्याला परवानगी नसतांना, कारखान्यात हाडांची मोठ्याप्रमात आवक होत असुन तेथील हाडांना मास चिटकून राहील्याने दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे नागरिक व शाळकरी बालकाचे आरोग्य धोक्याचे बनले आहे.
कोरोनाची तीसरी लाठ येत आहे.म्हणून या मराठवाडा हाड्डी कारखान्याच्या परवान्या बाबत सखोल चौकशी करुन कारखाना बंद ठेववा व कोरोनाची तिसरी लाठ येऊन जाई पर्यंत सदरिल सर्वच हड्डी कारखाने बंद करण्यात यावेत या मागणीसाठी तहसिलदार यांच्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत.
महाराष्ट्रात मास विक्रीवर बंदी असुन देखील या ठिकाणी कारखाण्यात मोठ्या प्रमाणात हाडांची ट्रकाद्वारे आवक होत असुन येथील परिसरात दुर्गंधी पसरत आहे. ही हाडे जनावरांची आहेत की माणसांची ही पाहणी व चौकशी उपप्रादेशीक अधिकारी व प्रदुषण विभागाकडून अद्यापही करण्यात येत नाही. तर मग या कारखान्यांना दर वर्षी उपप्रादेशीक अधिकारी,प्रदुषण विभाग नांदेड हे नुतणीकरन कसे करून देतात? परवानगी कशी देतात याबाबत येथील भागातला रहीवासी संभ्रमात पडला आहे.
येथील हाडाच्या कारखान्यामुळे दुर्गंधी पसरुन रोगराई विकोपाला पोहोचेल, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून हाडाचे कारखाने बंद करावेत यासाठी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे संघटक मनोहर कंजे ,गौतम वाघमारे यांनी दि.२२/११/२१ रोजी निवेदन दिले होते.
आता पुन्हा मानवी हक्क अभियान या संटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मारोती वाघमारे, तालुका अध्यक्ष यादव कदम यांनी दि.३० नोव्हेंबर रोजी तहसिलदार श्रीकांत निळे यांना दिलेल्या निवेदनात दि.६ डिसेंबर २१ रोजी पासुन बेमुदत सत्याग्रह करणार असल्याबाबत निवेदन दिले आहे.
www.massmaharashtra.com

   युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.वर 👆 फोटोवर क्लिक करून 

ताज्या बातम्या