मौजे कौठाळा येथे रान डुकराच्या हल्ल्यात ७५ हजार रुपयाची गाय दगावली – पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत द्या शेतकऱ्याची मागणी !!

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव तालुक्यातील मौजे कोठाळा येथे एका शेतकऱ्याच्या गायीवर रानडुकराने हल्ला चढविल्यामुळे  सदरची ७५ हजार रुपये किमतीची गाय जाग्यावर मृत्यू पावली असल्याची घटना दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास शेतात बांधलेल्या जागलीवर सदरची घटना घडली असल्याचे सदरच्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
कौठाळा येथील अनिरुद्ध भगवानराव डांगे यांच्या गट क्रमांक ५९ मध्ये त्यांच्या शेतात रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सदरचा हल्ला झाला असावा असा त्यांचा अंदाज आहे.
तालुक्यातील कौठाळा या गावातील शेतकरी यांच्या गायीवर रानडुकराने जागलीवर बांधल्या ठिकाणी जबरदस्त हल्ला चढविला असल्यामुळे त्या हल्ल्यात जखमी झालेली ७५ हजार रुपये किमतीची गाय जाग्यावर मरण पावली असल्याने वनपरीक्षेत्र अधिकारी देगलूर बिलोली यांनी तात्काळ गायीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान मिळवून द्यावेत अशी मागणी कौठाळा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
नायगाव तालुक्यात अनेक ठिकाणी डुकराच्या हल्ल्या मध्ये अधून मधून अनेक जखमी होत आहेत परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर बिलोली यांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना आर्थिक मदत करत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सदरच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्या मार्फत सदरील घडलेल्या घटनेमध्ये तात्काळ पंचनामा करण्या ऐवजी विलंब करत आहेत व शासन दरबारी त्यांना आर्थिक मिळवून देण्यास टाळाटाळ करीत असल्याने डुकराच्या हल्ल्यातील जखमी हैराण होताना दिसून येत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या