के रामलू शाळेचा विज्ञान प्रदर्शनात तालुक्यात प्रथम क्रमांक !

। कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
49 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने आयोजन करण्यात आलेल्या जयराम अंबेकर विद्यालय अर्जापूर येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शाळेच्या नववीतील विद्यार्थी पियुष संजय हमंद हा सादर केलेला रक्षक ॲप या प्रयोगाने माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक मिळवला.

विशेष म्हणजे दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी 68 शाळांनी सहभाग घेतला वर्ग नववीतील विद्यार्थी पियुष संजय हमद व श्रेयश बालाजी झंपलकर यांनी विज्ञान शिक्षक श्री कागळे सरांच्या मार्गदर्शनाने स्वतः रक्षक ॲप बनवला तो प्रयोग माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळवला.या प्रयोगाचे सादरीकरण पियुष संजय हमंद व श्रेयश बालाजी झंपलकर यांनी केले. त्यांच्या या ॲपचा सर्वत्र कुतूहल व कौतुक होत आहे.
या यशाबद्दल त्यांना मार्गदर्शन करणारे श्रीमान कागळे आर डी सर व त्या दोन विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थाध्यक्ष श्री साई रेड्डी ठक्कूरवार सर व सचिव श्री यशवंत संगमवार सर , संचालिका रमा ठक्कूरवार मॅडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री मठवाले पापयाप्पा सर आणि शाळेचे सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या