कृष्णा मेडेवार यांचा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या वतीने सन्मान.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव नगरपंचायतीचे लोकप्रिय उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण वाढदिवसानिमित्ताने नेत्र रोग निदान शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात विशेष कामगिरी केल्याबद्दल कृष्णा मेडेवारचा माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

 नायगाव येथे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड येथील लायन्स नेत्र रुग्णालय जगमवाड़ी नांदेड यांच्या सयुक्त विद्यामानाने मोफत नेत्र तपासणी व मोतबिंदू शत्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ऐश्वर्या 320 नेत्र रुग्णांची तपासणी आली.

तसेच 112 मोतीबिंदू नेत्र रुग्णाची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 28 मोतीबिंदू रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आले संपूर्ण नेत्र रोग शिबिरात विशेष कामगिरी केल्याबद्दल नायगाव येथील व्यापारी बालाजी मेडेवार यांचे चिरंजीव कृष्णा मेडेवार व राजकुमार पवार यांचा नायगावचे मा आमदार वसंतराव बळवंतराव चव्हान सत्कार करण्यात आला असून कृष्णा मेडेवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या