जलसंधारण पाटबंधारे विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसह, गुत्तेदाराच्या बेजबाबदारपणामुळे, कृष्णूरच्या पाझर तलावामुळे गाव धोक्यात ? प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज!

पाझर तलाव बांधलेल्या संबंधित भ्रष्ट अधिकारी अधिकारी यांच्या चौकशीची मागणी !!

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
शासनाकडून शेतकरी सुजलाम झाला पाहिजे यासाठी निसर्गाचे पाणी एकत्र जमा करण्यासाठी,  पाझर तलावाची निर्मिती करून शेकडो एकर जमीन पाण्याखाली यावी म्हणून कृष्णर जवळ रामदेव धाब्याशेजारी पाझर तलाव बांधण्यात आला. जलसंधारण विभागाअंतर्गत खर्च करून बांधलेला पाझर तलाव भ्रष्ट अधिकारी व गुत्तेदार यांनी बांधल्यामुळे पावसाच्या पाण्याने तलाव फुटून कृष्णुर गाव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून  तात्काळ प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज आहे.
तालुक्यातील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गाच्या लगत असलेल्या पाझर तलावाचे उंची वाढवण्याचे काम गेल्या दोन ते तीन महिन्या खाली एका गुत्तेदारा मार्फत करण्यात आले होते. परंतु जलसंधारण पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह गुत्तेदाराच्या बेजबाबदार पणामुळे सदरचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्यामुळे रामदेव बाबा धाब्या जवळील पाझर तलाव मध्य भागी पूर्णतः दबून गेल्यामुळे सदरचे पाझर तलाव फुटण्याची शक्यता असल्यामुळे कुष्णूर हे गाव धोक्यात आले असल्याचे सदरच्या तलावावर येऊन पाहणाऱ्या लोकांनी सांगितले असून सदरच्या गंबीर बाबीची अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घ्यावी. पाहणी करून यंत्रणा राबविली पाहिजे असे जनतेतून बोलल्या जात असून तलावाच्या दबलेल्या जागी तळ्यातुन पाणी पाझरत असल्यामुळे धोका निर्माण झाला आहे.
 तालुक्यातील कृष्णूर येथील पाझर तलावात गेल्या उन्हाळ्यात पुणे येथील एका गुत्तेदाराच्या मार्फत तळ्यातची उंची वाढविण्याचे काम करण्यात आले होते. सदरच्या गुत्तेदारासह नायगाव येथील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याच्या संगणमताने सदरील काम थातूर मातुर करण्यात आले. पिचिंग सुद्धा व्यवस्थित करण्यात आली नसल्यामुळे सदरच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसह गुत्तेदाराची चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
 रामदेव बाबा धाब्या जवळील पाझर तलावाची नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी चौकशी करून कारवाई करावी असे जनतेतून बोलल्या जात असून नव्याने झालेली पाळू फुटण्याच्या मार्गावर असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. अन्यथा गावातील घरे वाहून जातील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या