स्वाभिमानी कुंभार समाज सामाजिक संस्था नांदेड या संघटनेच्या बिलोली तालुका अध्यक्ष पदी साईनाथ शिरोळे.

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
कुंभार समाज बांधवांच्या वतीने बिलोली येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजभुषन संघटनेचे मुख्य मार्गदर्शक विश्वनाथराव कोलमकर कर्तव्यदक्ष जिल्हा अध्यक्ष विजयजी देवडे, जिल्हा सचिव शिवाजीराव पांगरेकर, युवा को. कमिटी अध्यक्ष बालाजी घुमलवाड,  विजयकुमार घुमाडे, रमेश देगावकर, प्रा.डाॅ.गणेश देवडे या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बिलोली तालुका अध्यक्ष निवड प्रक्रीया समाजातील प्रतिष्ठित व संघटनेतिल पदाधिकारी तसेच सर्वानुमते तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आली.

बिलोली तालुका अध्यक्ष म्हणून सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेले धडाडिचे कार्यकर्ते साईनाथ पुंडलिकराव शिरोळे यांची तर सचिव म्हणून गंगाधर जळबा मरकंटे तर उपाध्यक्ष म्हणुन सायलु बाबाराव कानगुलवार व साईनाथ शिवलिंग पाशावार तर युवा तालुकाअध्यक्ष सुरेश मेहत्रे तालुका कार्याध्यक्ष म्हणून गंगाधर कानगुलवार, मुख्य सल्लागार विठ्ठल राजुरे, तालुका संघटक म्हणून दत्तात्रय कानगुलवार व शिवाजी कानगुलवार निवड करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यानां नियुक्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व पुढिल कार्यास त्यानां भरभरुन शुभेच्छा देण्यात आल्या.
कुंभार समाज विकासापासून कोसो दूर असलेला समाज आता चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह चालवत आहे पण अत्याधुनिक यंत्रसामग्री च्या सहाय्याने कुंभार काम केल्यास वेळ, मेहनत वाचण्यास नक्कीच मदत होईल. शासन स्तरावर येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी आपन सदैव कुंभार समाज बांधवांच्या पाठीशी असल्याचे सुतोवाच साईनाथ शिरोळे यांनी केले
मागील काळात बिलोली तालुका अध्यक्ष पदाची धुरा केरुर चे माजी सरपंच बालाजी कुरणापल्ले यांनी चांगल्या प्रकारे सांभाळली. येणाऱ्या काळात सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली जावी अशी आशा जिल्हा अध्यक्ष विजयजी देवडे साहेब यांनी व्यक्त करुन सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी दतात्रय राजरवार (जिल्हा संपर्कप्रमुख) हानमंतराव कानगुलवार, पुंडलिकराव शिरोळे सायलु पाशावार, शंकरराव कुरणापल्ले, बालाजी पाशावार, संजयराजे नायगावकर, बालाजी कुरणापल्ले, साहेबराव मिर्झापुरे, पिराजी मरकंटे, अशोक तुमेदवार, पोशट्टी मदनुरे, दत्तात्रय तुमेदवार, राजु मिरदोडे, बालाजी मरकंटे, श्रीकांत तुमीदवार, तुकाराम तेलंगे, माधव कानगुलवार, गंगाधर मिरदोडे यांच्या सह असंख्य कुंभार समाज बांधवांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या