कुंचेली येथील शेतकऱ्याच्या शेतात आग लागल्याने सोयाबीनचा ढग जळून खाक व लंम्पी आजाराने गाय, गोरे दगावल्याने शेतकरी अडचणीत सापडला – शासनाचे दुर्लक्ष !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
नायगाव तालुक्यातील कुंचले येथील शेतकरी शेख इस्माईल यांच्या कुटुंबावर विविध नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या आर्थिक संकटात असताना या बाबीकडे शासनाची दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे नायगाव तालुक्यातील कुंचेली येथील शेतकरी शेख इस्माईल यांच्या शेतात काही दिवसापूर्वी शासनाच्या कडून अडीच लाख रुपये घेऊन व सावकाराकडून व्याज काढून अडीच लाख रुपये घेऊन एकूण पाचलाख रुपयांचे विहीर काढून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पेरणी केली होते.

परंतु हाताला आलेले सोयाबीनचे पीक कापणी करून शेतात ढीग टाकून ठेवण्यात आला होता, परंतु दिनांक 4 नोव्हेंबर रोजी एक हेक्टर 41 आर जमिन मधील सोयाबीनच्या ढगाला अचानक आग लागल्याने जळून खाक झाल्यामुळे शेतकऱ्याचे दोन लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तसेच याच शेतकऱ्याच्या लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गाभण असलेलीं गाय अंदाजे चाळीस हजार रुपयांची, दिनांक 24 सप्टेंबर रोजी लंपि रोगामुळे मृत्यू पावली दिनांक 7 नोव्हेंबर रोजी एक गोरा अंदाजे वीस हजार रुपये पर्यंत असलेल्या रोगामुळे मृत्यू झाला असल्याने शेतकरी तहसील ,कृषी विभाग, पोलीस स्टेशन , आदी विविध ठिकाणी शासनाच्या दारोदारी फिरून तक्रारी देऊनही शासनाकडून कसल्यास प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेतकऱ्याने शासनाकडे मदतीची मागणी करूनही आर्थिक मदत न मिळाल्यास आत्महत्या करेल असे शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या