कुंडलेश्वर बांधकाम संघटनेला महामंत्री सुरोशे यांची भेट !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
          येथील कुंडलेश्वर बांधकाम संघटनेच्या वतीने शहरातील बांधकाम मजुरांचे विविध प्रश्न सोडविण्याचे काम चालू आहे,हे काम पाहून भारतीय मजदूर महासंघाचे महाराष्ट्राचे महामंत्री संजय सुरोशे यांनी कुंडलेश्वर बांधकाम संघटनेला येथील महालक्ष्मी मंदिर येथे भेट देऊन बांधकाम मजुरांशी चर्चा केले.यावेळी त्यांनी भारतीय मजदूर महासंघात कुंडेश्वर बांधकाम संघटना सहभागी व्हावे असे आवाहान केले आहे.
आगामी काळात कुंडलेश्वर बांधकाम संघटने अंतर्गत असलेल्या प्रत्येक मजुरांच्या सर्व अडीअडचणी,समस्या व शासनाच्या विविध योजनेचा सवलती बांधकाम मजुरांना मिळवून देण्याचे आश्वासन बांधकाम मजुरांना दिले.
          या भेटी दरम्यान भारतीय मजदूर महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष सोपान भिदे,बांधकाम संघटनेचे तालुकाध्यक्ष सयाराम मुक्केरवार, कुंडलेश्वर कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश जायेवार, उपाध्यक्ष सायलु ब्यागलवार,सचिव साईनाथ येवतीवाड, कोषाध्यक्ष गौतम वाघमारे, रमेश ब्यारमवार, शिवराम कोलंबरे, शिव जायेवार, गफार पठाण, राम गनारकर, श्याम गणारकर, अतीक शेख, श्रीकांत बोलचटवार, सुरेश बिरमवार, नागेश तेलकेश्वर, नामसमवार गंगाधर, रमेश पालाकुर्तीवार, पोचीराम गांजरे, राजू भोरे, शिवा मोकळे, आदीसह अनेक बांधकाम मजूर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या