कुंडलवाडीच्या मुख्याधिकाऱ्याचा कारभार तहसीलदारांकडे ; प्रभारी मुख्याधिकारी म्हणून तहसीलदार श्रीकांत निळे यांच्याकडे अतिरिक्त कारभार !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे हे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी रजेवर गेले असता,त्यांच्या उर्वरित रजेच्या कालावधीसाठी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीकांत निळे यांच्याकडे मुख्यधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
कुंडलवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे हे दिनांक 11 मार्चपासून रजेवर आहेत. त्यांच्या रिक्त असलेल्या जागेवर बिलोलीचे कर्तव्यदक्ष तहसिलदार श्रीकांत निळे यांना मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिनांक 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका पत्राद्वारे मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.
प्रभारी मुख्याधिकारी श्रीकांत निळे यांच्यासमोर कुंडलवाडी शहरातील मूलभूत सोयीसुविधे सोबत, शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आहे. तसेच शहरातील घरकुल लाभार्थ्यांची कामे, बांधकाम परवाना, आदी कामासोबत शहरातील विविध विकास कामांना सामोरे जावे लागणार आहे. सध्यस्थितीत नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून उपजिल्हाधिकारी सचिन गिरी हे काम पाहत आहेत. सदरील निवडीबद्दल तहसीलदार श्रीकांत निळे यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे .
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या