कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी 95 टक्के मतदान !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
           येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी दिनांक सात रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून त्यात 94.94 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

            कुंडलवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेसाठी शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा व कृषी उत्पन्न बाजार समिती असे दोन मतदान केंद्र ठेवण्यात आले होते, त्यामध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा येथे विविध सेवा सहकारी मतदार संघ 212 पैकी 210 ग्रामपंचायत मतदार संघ 209 पैकी 207, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हमाल मापाडी मतदार संघ 192 पैकी 165 असे एकूण 613 मतदाना पैकी 582 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
             यावेळी महाविकास आघाडी व महायुतीच्या अनेक नेत्यांनी मतदान केंद्राला भेटी देऊन वातावरण निर्मिती केले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली असून मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे याची मतगणना दिनांक 8 रोजी सकाळी 9 वाजतापासून नगरपालिका सभागृह येथे पार पडणार आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी आर कोरवार यांनी काम पाहिले तर मतदान केंद्राबाहेर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले,पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या