कुंडलवाडी भाजपा कार्यकर्त्यांची विविध पदावर निवड

 [ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
          आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुंडलवाडी भाजपा शहर शाखेच्या वतीने शहरातील प्रामाणिक व एकनिष्ठ असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामध्ये शहर युवा मोर्चा उपाध्यक्षपदी राज अशोक खांडरे, श्रीकांत गंगाधर नुकलवार, सरचिटणीस जयवंत नागन्ना मठ्ठमवार, युवा मोर्चा अनुसूचित जमाती शहराध्यक्ष पदी रमेश नरसिमलू नागुलवार, उपाध्यक्षपदी मोहन राजेंना जायेवार, युवा मोर्चा अनुसूचित जाती शहराध्यक्ष पदी सुरेश सिद्धराम कंपाळे उपाध्यक्ष पदी गंगाधर चंदर वाघमारे, अल्पसंख्यांक महिला अध्यक्षपदी माजी नगरसेविका शेख रिहाना पाशामिया तर उपाध्यक्षपदी फरहद सुलताना रियाज पठाण आदिची निवड करण्यात आली आहे.
           या निवडीबद्दल माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण ठक्करवाड, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर,माजी उपाध्यक्ष विठ्ठल कुडमुलवार,शहराध्यक्ष हनुमान माझी शहराध्यक्ष शेख जावेद, युवा शहराध्यक्ष पंढरीनाथ पुप्पलवार, लक्ष्मण भंडारे,आदिसह अनेक भाजपा कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या